डिझेल – पेट्रोल चोर पोलिसांच्या अटकेत

26

🔺४२,८८८ रू कीमतीचे चोरी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6सप्टेंबर):-सौ. वंदना दिपक बोकडे यांचे स्वतःच्या मालकीने साईगणेश पेट्रोलपंप पाचगाव ता. ब्रम्हपुरी येथे असून दि.१७/०७/२०२१ चे २२:०० वा ते १८/०७/२१ चे ०७:०० वा दरम्यान अज्ञात आरोपीतांनी सदर पेट्रोल पंपाच्या इलेक्ट्रीक रूममध्ये सीसीटीव्ही निगराणीमध्ये न येता लपतछपत प्रवेश केला.सीसीटीव्ही कॅमेराचे मुख्य स्वीच व बाहेरील लाईट बंद करून तसेच मीटर मशीनच्या प्रकाशात कोणी बघु नये याकरीता मीटर मशीनवर पोते झाकून मशीन सुरू करून नोझलद्वारे काढून अं २०० ली डीझेल व २०० ली पेट्रोल असे दोन्ही मिळून ४२,८८८ रू कीमतीचे चोरी केलेले होते.मा. वरीष्ठांच्या आदेशाने ब्रम्हपुरी पो स्टे. हद्दीतील जास्तीत जास्त मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास पो.स्टे. विशेष पथकाकडे सोपविण्यात आला होता.

सदर गुन्हयात पोलीस अभिलेखावरील आरोपी सोनू मेश्राम हा संशयीत आरोपी होता मात्र त्याचे विरुद्ध पुरावा मिळून येत नव्हता त्याने चौकशीदरम्यान उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याला अधिक विश्वासात घेवून विचारपुस करून तसेच त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले संशयीत आरोपी सोनू मेश्राम याने त्याचेसोबत मयुर रामभाउ नाकतोडे (१९), शुभम रामभाउ नाकतोडे(२१) , अपराजीत अरुण माकडे (२२) सर्व रा. उदापूर हे प्रत्यक्षात सहभागी असल्याचे सांगीतले वरील सर्व आरोपींना अटक करून त्यांचेकडुन त्यांनी गुन्हयात वापरलेली दोन मोटरसायकल चोरीचे इंधन भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लॅस्टीकच्या कॅन जप्त करण्यात येवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला.
सदरची कारवाई मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलींद शिंदे, पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव यांचे मार्गदर्शनात सपोनि आशिष बोरकर, पो.हे.का नरेश रामटेके, सिद्धार्थ पेठकर, नापोका मुकेश गजबे, प्रमोद सावसाकळे, प्रकाश चिकराम यांनी केली.