पिंपळगाव बसवंत मंडल निरीक्षक व पोलीस ठाणे अंतर्गत विविध मागणी संदर्भात अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निदर्शने करून निवेदन

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.6सप्टेंबर):- पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशन व मंडल निरीक्षक सर्कल अंतर्गत येणारे कोकणगाव येथील शेतकऱ्याचा जाण्यायेण्याचा पूर्वापार वहिवाट रस्ता होऊन अतिक्रमण करणाऱ्या नराधम आवर कठोर कारवाई करण्यात येऊन सुरळीत करण्यात यावा कोकणगाव येथील घटस्फोटित निराधार महिला वृद्ध शेतमजूर व वृद्ध कलावंत नागरिकांना शासकीय मानधन मंजूर करण्यात यावे ,तसेच पिंपळगाव बसवंत भाऊ नगर येथील आदिवासी महिलांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा.

या मागणी करता अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य व या सामाजिक संघटनेच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय: रवींद्र दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंत पोलीस निरीक्षक श्री पठारे व मंडल निरीक्षक श्री उगले व तलाठी श्री पाटील तात्या यांना निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी समितीचे तालुका अध्यक्ष माननीय श्री भाऊ जाधव, पिंपळगाव शहर अध्यक्ष सुरेश गांगुर्डे, सुरेश बाई डांगळे, नितीन भाऊ पठाडे ,प्रमोद शिंदे, अशोक भाऊ बागुल ,संदीप साबळे ,भागवत, गौतम पठाडे, अनिल घेगडे,प्रमोद गरुड, चंद्रभान गरुड, प्रकाश गांगुर्डे, बाळासाहेब पठाडे, तांबोळी अब्बास ,निर्मला गायकवाड, रेखा जाधव ,भारती साळवे, कोमल जाधव, सुनंदा बागुल, सुरेश गांगुर्डे ,घनश्याम जाधव, सागर जाधव ,प्रवीण बागुल, आधीच बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी समितीच्यावतीने रवींद्र जाधव यांनी निवेदनात नमूद केलेल्या मागणीचा विचार न केल्यास स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला तर पोलीस निरीक्षक पठाडे व मंडल निरीक्षक उगले व कामगार तलाठी पाटील यांनी सदर निवेदनात संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात येऊन न्याय देण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED