बळीराजाच्या बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट

27

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

गडचिरोली(दि.6सप्टेंबर):- वर्षभर शेतकर्‍यासोबत राबणार्‍या ढवळ्या पवळ्या बैलाप्रती कृृृृतज्ञता व्यक्त करणारा सण पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा होत आहे. यंदाही बैलपोळ्यावर कोरोनाने विरजण घातल्याने पोळा भरण्यावर प्रतिबंध असल्याने बळीराजासह बैलमालक हिरमुसला.

वाडा शिवार सार वडिलांची पुण्याई किती वर्ण तूझे गूण मन मोहरून जाई तुझ्या अपार कष्टान बहरले सारी भई एका दिवसाच्या पूजेने उतराई एक नमन पार्वती गौरा हरहर महादेव अश्या झडत्या देत बळीराज्याच्या दैवताचा पोळा हा सण आज सोमवारी साजरा होत आहे. मात्र कोरोना महामारीने सार्वजनिक ठिकाणी सण ऊत्सव साजरा करण्यावर प्रतीबंध घातल्याने बैल पोळ्यात तोरणाखाली घाट लागणार नसल्याने सालभर राबला पुर्बी नाही जेवला. अशी गत ढवळ्या पवळ्या बैलासह शेतकर्‍याची झाल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.