बेपत्ता मयूरी वाघीण प्रकरणाची चौकशी करा- कवडू लोहकरे

54

🔺मयुरी बेपत्ता प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.6सप्टेंबर):-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोन मध्ये वनकर्मचारी गस्तीवर असतांना वाघीणचे तिन बछडे अशक्त अवस्थेत आढळुन आले. त्यातील एक बछडा मरण पावला. दोन बछड्याची आई मयुरी वाघीणीचा शोध घेण्यासाठी वनकर्मचा-यांनी वन श्रेञात पायपीट केली परंतु थांग पत्ता लागेना. कित्येक महिन्यांपासून वाघीण बेपत्ता आहे. याचाच अर्थ घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. खडसंगी बफर झोन लगत कोलारा कोअर , मदनापुर बफर , पळसगाव बफर, रामदेगी क्षेत्र लागुनच आहे परंतू त्याही परिसरात वाघीण बेपत्ता असल्याची चिन्हे दिसत आहे.

ज्या परिसरात वाघीण ने बछड्यांना सोडलं याच परिसरात घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. शिकार होऊन अवयवांची तस्करी सुद्धा होऊ शकते. याच परिसरात वाघीण वर विद्युत प्रवाहचा वापर करुन घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. असे अनेक प्रकारचे संशय या प्रकरणात निर्माण झाल्याने वनविभागाने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्याची गरज आहे. या परिसरात वन्यजिवांची शिकार करणा-यांच जाळ मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे.

तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वन्यजिव प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली आहे.चिमुर परिसरात शिका-यांची टोळी सक्रिय आहे. लहान पिल्लांना सोडून जाने व परत न येणे संशयास्पद आहे. इतक्या कमी वयात वाघीण पिल्लांना सोडुन जाऊ शकत नाही. तपासाची चक्रे फिरवावित असे मत कवडू लोहकरे यांनी व्यक्त केले.