भाजपा युवा मोर्चाने मुख्यमंत्री ठाकरेंना पाठविले 50 पोस्ट कार्ड

🔹मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लक्षात राहण्याकरिता पाठविली पत्र

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.5 सप्टेंबर) :-या वर्षी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देश साजरा करत आहे. अशातच 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाषण करतांना या अमृत महोत्सवाचा विसर पडला. भाषण करत असतांनाच मुख्यमंत्री ठाकरेंनी “हा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव?” असा प्रश्न मांचावरील उपस्थितांना विचारला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृत महोत्सव लक्षात न राहणे ही खेदाची बाब आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या कृत्याचा निषेध आज भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहराच्या वतीने नोंदविण्यात आला.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लक्षात राहावा म्हणून 50 पोस्ट कार्ड पाठविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लक्षात ठेवावे अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आले.

या प्रसंगी भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी शहराचे अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, शहर महामंत्री रितेश दशमवार, भाजपा ओबीसी आघाडीचे शहर अध्यक्ष पंकज माकोडे, युवा मोर्चा शहर शहर उपाध्यक्ष अमित रोकडे, सचिव दत्ता येरावार, ओंकार हरदास यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED