पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची धडक कार्यवाही

🔺२४०० लिटर अवैध गावठी दारूचा अड्डा केला उध्वस्त !..….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगांव(दि.6सप्टेंबर):- आज दिनांक ५ सप्टेंबर , २०२१ रोजी सकाळी ६ वाजता नांदेड तालुका धरणगाव शिवारात तापी नदीचे काठी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन चे २०० लिटर मापाचे १२ टाक्या रसायने भरलेल्या मिळून आल्याने रसायन पंचांसमक्ष जागीच नाश करण्यात आलेले आहे.

सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक मा.शंकर शेळके साहेब, फौजदार करीम सय्यद, पोलीस नाईक मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदांशिव, प्रवीण पाटील, वैभव बाविस्कर या संपुर्ण टीम ने केलेली आहे.

क्राईम खबर , महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED