गेवराई तालुक्यातील अमृता नदीवरील पूल गेला वाहून, पुराचे पाणी गावात घुसल्याने जनजीवन विस्कळीत

44

✒️प्रतिनिधी गेवराई(नवनाथ आडे)

गेवराई(दि.६सप्टेंबर):- पावसाअभावी दरवर्षी टंचाईचा सामना करणाऱ्या गेवराई तालुक्याने पावसाचे रौद्ररूप अनुभवले तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला असून मुसळधार पावसाने रात्रीत भोजगाव येथील अमृता नदीवरील पूल वाहून गेला आहे. व नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. भोजगावचा संपर्क तुटला आहे. जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले शेतातील उभे असलेले पिके नेस्तनाबूत झाले आहे.

उडिद,बाजरी,कापूस, सोयाबीन, व पाईप लाईन,ठिबंक सिंचन वाहून गेले पिकांचे अतोनात नुकसान झाले. तलाठी कुलकर्णी साहेब, ग्रामसेवक शिंदे साहेब,विष्णू आडे, कोतवाल श्रीकृष्ण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी आणि गावकऱ्यांनी स्थळ पाहाणी केली आहे. नदीतील वाळू शेतीत गच्च भरली केळी, मोसंबी च्या बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या. पिण्याच्या पाण्याची विहीर गढूळ झाले आहे. गावातील जगदंबा मंदिर पहिल्यांदाच पुराच्या विळख्यात सापडले आहे.भोजगाव परिसरात नदीचे पाणी शेतात शिरल्याने जमिन वाहून गेली तर पूल फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

जोरदार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी व महसूल प्रशासनाने लोकांना मोफत रेशन आणि पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी भोजगाव / कोमलवाडी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच सौ. अरूणा विष्णू आडे यांनी केली आहे. तसेच अमृता नदी ने रौद्र रूप धारण केले आणि होत्याचे नव्हते झाले.जोरदार पावसाने हजेरी लावली मुसळधार पावसाने अनेक गावांतील नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले.
तर या जोरदार पावसाचे रौद्ररूप गेवराई तालुक्याने अनुभवले तालुक्यातील अमृता नदी अनेक दिवसांपासून पूराच्या प्रतिक्षेत असलेल्या अमृता नदीला पूर आला असून भोजगाव या गावात पाणी शिरले आहे. तसेच कोमलवाडी येथील तलाव ओव्हर फ्लो झाला आहे