ओबीसी जोडो अभियान ची सुरुवात

29

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी (दि.6सप्टेंबर):-दिनांक २६.९.२१ रोजी बीड येथे आयोजित व्हिजेएनटी ओबीसी आरक्षण जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा प्रसार प्रचार व ओबीसी जोडो अभियान ची सुरुवात क्रांतीची मशाल पेटवून आज दिनांक ५.९.२१रोजी राज्यातील ओबीसींचे उर्जा व प्रेरणास्थळ *गोपीनाथ गड* येथे नतमस्तक होऊन करण्यात आली.त्यानंतर दुपारी समस्त ओबीसी समाज बांधवांची बैठक सिरसाळा येथे आयोजित करण्यात आली.

यावेळी माजी आ.केशवराव आंधळे,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण, समता परिषदचे विभागीय अध्यक्ष अँड सुभाष राऊत, अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष जे डी शाहा, संयोजक अर्जून दळे, गणेश जगताप, कैकाडी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गायकवाड, प्रकाश कानगावकर, प्रा.लक्ष्मण गुंजाळ, अंकुश निर्मळ,युवराज शिंदेयांची उपस्थिती होती.

सिरसाळा येथील बैठक वसंत राठोड,अंकुश राठोड, नामदेव गायकवाड, मुन्ना काळे,बालाजी बहिरे,रवि चाटे, बप्पा सलगर, गुरुदत्त पुरी, गोविंद राठोड, राहुल राठोड, विकास गायकवाड, कृष्णा गडदे, संजय राठोड,विजय गायकवाड,हानुमंत पवार,मिथुन राठोड,महादु राठोड, सुशिल राठोड,बाळु राठोड,पवन जाधव, विनोद चव्हाण,नितीन पवार, केशव बनसोडे, मस्तान कुरेशी,तौफीक सिद्दीकी,सुभाष पवार,कुमार खाडे,व बहुजन समाजातील बंजारा व कैकाडी आणि विविध जातीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.