झाडीबोली साहित्य मंडळातर्फे झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने पंधरा शिक्षकांचा गौरव

25

✒️मुल(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुल(दि.6सप्टेंबर):-झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित मुल येथे कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या पहिल्या मोरगाड काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पंचायत समिती सभागृहात आयोजित ह्या छोटेखानी स्वरूपाच्या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष प्राचार्य सौ. रत्नमाला भोयर यांनी केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.

नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख डाॕ. गुरूप्रसाद पाखमोडे नागपूर , भाष्यकार म्हणून कवी अरूण झगडकर , कवी डाॕ.चंद्रकांत लेनगुरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून पं.स. चे सभापती चंदू मार्गोनवार, संवर्ग विकास अधिकारी मयूर कळसे ,गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील शेरकी , गंगाधर कुनघाडकर , अंनिस चे
विलास निंबोरकर , विजय भोगेकर सौ.शशीकला गावतुरे आदींची उपस्थिती होती . प्रास्ताविकातून लक्ष्मण खोब्रागडे यांनी प्रास्तविक केले.

भाष्यकार अरूण झगडकर आणि डाॕ. लेनगुरे यांनी मोरगाड ह्या काव्यसंग्रहात आलेली अस्सल झाडीबोली आणि त्या शब्दसमुच्चयामुळे मोरगाडचे वाढलेले आंतरिक सौंदर्य यावर प्रकाश टाकला.मयुर कळसे आणि डाॕ.पाखमोडे यांनी कवी खोब्रागडे यांनी घेतलेल्या परिवर्तनवादी विषयाचे कौतुक केले. प्राचार्य सौ. भोयर यांनी झाडीबोली कवितांचे वेगळेपण अधोरेखित केले. बंडोपंत बोढेकर म्हणाले, मोरगड काव्यसंग्रह हे झाडी शब्दांच संकलन नसून ते झाडीपट्टीचा जाणिवात्मक विचार आहे. याप्रसंगी शिक्षक दिनाच्या निमित्ताने झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील पंधरा उत्कृष्ट शिक्षकांना झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार देऊन गौरवविण्यात आले.पुरस्कारादाखल मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तिपत्र,मानवस्त्र देण्यात आले.

यामध्ये रामकृष्ण चनकापुरे पोंभुर्णा,सुरेश डांगे चिमूर , सुनिल पोटे बल्लारपूर ,प्रशांत भंडारे गोंडपिपरी , सुखदेव चौथाले मुल , सौ. मालती सेमले सावली, दिलीप पाटील राजुरा,प्रदिप मडावी जिवती, पंडीत लोंढे वरोरा , संभाशिव गावंडे कोरपना, सरीता गव्हारे चंद्रपूर, डॉ. सुधीर मोते भद्रावती, बेनिराम ब्राम्हणकर सिंदेवाही,भाविक सुखदेवे ब्रम्हपुरी, पूनाराम निकुरे नागभिड इत्यादींचा समावेश होता.दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवी संमेलन गजलकार नेताजी सोयाम यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री प्रभाताई चौथाले ,गजेंद्र कोपुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यात नंदकीशोर मसराम,संतोष मेश्राम,अर्जुमन शेख,दुशांत निमकर,अरुण घोरपडे, नेतराम इंगळकर, संतोष कुमार उईके, डाॕ.अशोक कुळे,जयंत लेंझे,भारती तितरे ,वृंदा पगडपल्लीवार तसेच इतर साहित्य प्रेमीनी आपल्या काव्यरचनांचे सादरीकरण केले.
सूत्रसंचालन नागेंद्र नेवारे , विरेनकुमार खोब्रागडे यांनी केले आणि आभार परमानंद जेंगठे यांनी मानले .