आदर्शमाता प्रतिष्ठानच्या वतीने इस्लामपूर येथे शिक्षकांचा सत्कार

✒️इस्लामपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

इस्लामपूर(दि.6सप्टेंबर):-कराड तालुक्यातील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त इस्लामपूर तालुका वाळवा येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिष्ठानच्यावतीने आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील यशवंतराव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका मंगल पाटील, वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील प्रा.जे.एस.पाटील, इस्लामपूर तालुका वाळवा येथील प्रा. डॉ. संजय थोरात यांच्या सह शिक्षक बांधव आणि भगिनींचा सत्कार आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या हस्ते तर पत्रकार संपत जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.मंगल पाटील म्हणाल्या, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम खरोखरच गौरवास पात्र आहेत. ध्येय आणि उद्देश सार्थ ठरविण्याचे काम संस्थेकडून होताना दिसत आहेत, ही आनंदाची बाब आहेत. आज शिक्षकांचा शिक्षक दिनी सत्कार करून खरंच संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे आणि शिक्षकांबद्दल आपुलकी आणि प्रेम दाखविले आहे यापुढेही अशा सामाजिक कार्यात सक्रिय राहावं अशी अपेक्षाही प्रा. मंगल पाटील यांनी व्यक्त केली. स्वागत आणि प्रास्ताविक संपत जाधव यांनी केले,तर आभार विश्वास मोहिते यांनी मानले. यावेळी आदर्श माता प्रतिष्ठान चे संपतराव मोहिते, अनिल बडेकर, पाडळी (केसे ) चे ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर, आदर्शमाता प्रतिष्ठानचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष जावेद मुजावर, कृष्णात पवार, सचिन बडेकर, बापूराव कांबळे सह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED