कोरोनाचे नियम पाळत बैल पोळा उत्साहात साजरा- पोलिसांचा चोख बंदोबस्त

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.6सप्टेंबर):-बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सन उत्साहात साजरा केला जातो, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळा सणाचे दिवसी नांगरापासुन आणि शेतिपासुन दूर ठेवले जाते, या दिवसी त्याना विविध रंगाच्या वस्त्र (झूल) आणि रंगरंगोटीने सजविले जाते, वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलाना पोळ्याच्या दिवसी तुपाने किवा हळदीने शेकतात आणि बैलाना गोड़ पूरणपोळीचा नैवेध दिला जातो.

या वर्षी कोरोनाचा प्रभाव सुरु असल्यामुळे व जिल्हाधीकारी चंद्रपुर यांनी बैल पोळा व तान्हा पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी बैलाना सजऊन ढोल तासाच्या गजराज चिमूर चे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी आणून गावात मिरवणूक काढली व घरी आणून बैलाची पूजा करत अगदी साधेपनाने हा उत्साह साजरा केला.

बैल पोळा उत्सव दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता सहायक पोलिस अधीक्षक नितिन बगाटे, ठाणेदार मनोज गभने, सहाय्यक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक राजू गायकवाड़, अलीम शेख, सुशीलकुमार सोनवाने, सोरदे व सर्व अधिकारी यानी चोख बंदोबस्त ठेवला होता,

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED