धरणगांव व्यायाम प्रसारक मंडळाकडुन ” बालकुस्तीगीरांचा ” सन्मान…

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगाव(दि.6सप्टेंबर):- महाराष्ट्र राज्य स्टुन्डस ऑलम्पिक असोसीएशन संघटनेकडुन पनवेल येथे आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती खेळ स्पर्धेत धरणगावचे बाल कुस्तीगीर महेश रमेश वाघ, चेतन जिजाबराव माळी, सिध्दांशु शिवाजी चौधरी यांनी विविध वजन गटात यश मिळवुन धरणगाव शहराचे नाव रोशन केले .

या निमीत्ताने व्यायाम प्रसारक मंडळ कडुन त्रिमुर्तींचा सत्कार करण्यात आला . तसेच त्यांचे प्रशिक्षक संतोष कंखरे यांचाही सत्कार करण्यात आला. आगामी काळात वरील विजेताचीं हरियाणा मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कुस्तीपटु मा.भानुदासजी विसावे यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुस्तीगीर संघाचे विनोद पहेलवान , प्रविण वऱ्हाडे, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सर, रावा मांगो महाजन , सुभाष सोनवणे किशोर वाघ, जयेश महाजन , सुरेश माळी , हरी माळी, शामराव महाजन , भैया वैदू पहेलवान , हिलाल माळी, अनिल निकम, बाळु महाजन व मोठ्या संख्येने धरणगाव वासी उपस्थित होते .

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED