भावसार सदभाव संपर्क अभियान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6सप्टेंबर):- चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य भावसार बांधव आहेत भावसार विकास बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ सुनील भावसार यांच्या सद्भाव संपर्क अभियान मोहिमेत भावसार समाजाची दिशा व दशा या विषयावर सविस्तर व समर्पक चौफेर मार्गदर्शन झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर, प्रमुख वक्ते डॉ सुनील भावसार नाशिक, प्रमुख पाहुणे भास्कर मुधोळकर, जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, शहराध्यक्ष अभिलाशा मैंदळकर, कमलताई अलोने, छायाताई बर्डे, वैशाली जोगी, प्रीती लगदिवे, कांता दखणे, पायल बर्डे, बबन धनेवार, अनिल लाखदिवे किरण बर्डे, मीनाक्षी अलोने आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ सुनील भावसार आपल्या उधबोधनात म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य भावसार समाज आहे त्यांची दिशा व दशा काय आहे हे माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना संघटित करून जिल्ह्यात राजकारणात समाजकारणात आपले स्थान व अस्तित्व काय आहे हे दाखविता आले पाहिजे.सर्व समाजबांधव आम्ही क्रियाशील आहो हे समाजाला पटवून देता आले पाहिजे तेव्हा शासन दरबारी राजकारणात व सामाजिक कार्यात दखल घेतल्या जाते समाजाला योग्य नेतृत्व नसेल तर समाज भरकटत जातो, आणि समाजाच्या तळागाळातील घटकापर्यंत पर्यंत सेवा देता येत नाही. समाजाला सक्षम आणि वजनदार नेतृत्व लाभल्यास समाज संघटित होण्यास वेळ लागणार नाही.

त्याकरिता तन-मन-धनाने समाजाला समर्पण करणाऱ्या व्यक्तीला पुढाकार देण्यात यावा या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर भावसार सद्भाव संपर्क अभियानाची सुरुवात डॉ सुनील भावसार यांनी नाशिक वरून सुरू केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात भावसार यांचे अस्तित्व स्थान काय आहे हे पटवून देता येईल व राजकारणात व शासन दरबारी याची नोंद घेण्यास भाग पाडता येईल तरी सर्व भावसार समाजातील बंधू-भगिनींनी एकसंघ होऊन कार्याची व्याप्ती वाढवावी व समाजोपयोगी उपक्रमावर भर देऊन समाज बांधव संघटित करावे.असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन, छायाताई बर्डे यांनी केले प्रास्ताविक योगिता धनेवार यांनी तर अभिलाशा मैंदळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED