चामोर्शी :- दोन गावाचा कार्यभार एकाच पोलीस पाटलावर

🔸मारकंडा कंनसोबा येथे पोलीस पाटलाची नियुक्ती करणे गरजेचे आहे

✒️श्री भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.6सप्टेंबर):-चामोर्शी तालुक्यातील मारकंडा कंनसोबा येथील पोलीस पाटलाचे पद चार वर्षे पासून रिक्त आहे मारकंडा कं ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बामनपेठ येथील पोलीस पाटलाकडे पदभार देण्यात आला आहे.

बामनपेठ हे अंतर मारकंडा कं पासून चार पाच किलोमीटर आहे गावात कोणती समस्या निर्माण झाली तर पोलीस पाटलाची आवश्यकता पडल्यास बामनपेठ येथून पोलीस पाटील वेळेवर पोहोचू शकत नाहीत अजूनही शासनाकडून कोरोणाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत.

व आता होणाऱ्या पोळा. गणेश उत्सव शारदा उत्सवात दोन गावातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात अडचण येणार आहे करीता मारकंडा कं येथील चार वर्षे पासून रिक्त असलेली पोलीस पाटलाची नियुक्ती केल्यास मारकंडा कं येथील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यास मदत होईल असे सृज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED