शेततळ्यात बुडून सख्या भावांचा मृत्यू

🔹साताळी शिवारात राहणारे एरंडगावच्या जगताप कुटुंबियांसह दोन्ही गावात शोककळा

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.6सप्टेंबर):-एरंडगाव येथील संतोष पुंडलिक जगताप यांच्या दोन्ही मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने जगताप कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर व परिसरावर शोककळा पसरली आहे.संतोष जगताप पत्नीसोबत प्रथेनुसार सण घेऊन पाहुण्यांकडे गेले असता. घरी कुणीही नसतांना त्यांची दोन्ही मुले हर्षद संतोष जगताप (१३) व सार्थक संतोष जगताप (11)सायंकाळी पाचच्या दरम्यान तळ्या कडे गेले लहान मुलगा सार्थक (शिवा) तळ्यात पोहण्यास उतरला मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला मोठा भाऊ हर्षल त्याला वाचविण्यासाठी गेला.

परंतु दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला हर्षद व सार्थक दोघेही मुले साताळी येथील जिल्हा परिषद शाळा साताळी येथे शिकत होते हर्षद इयत्ता ७ वी व सार्थक इयत्ता ५ वी मध्ये शिकत होते.

मुले घरात न दिसल्याने त्यांनी शोधा शोध केली असता तळ्याच्या काठावर कपडे सापडले तेव्हा काहीतरी अघटित घडले असावे असा संशय त्यांनी तळ्यामध्ये शोध सुरू केला असता दोन्ही मुले पाण्यात सापडली त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ यांनी मृत घोषित केले दरम्यान या घटनेने संतोष जगताप यांच्या वंशाचा दिवा हरपला आहे येथे दार वर्षी अतिशय आनंदाने बैल पोळा सण साजरा केला जातो. परंतु प्रत्येकाच्या काळजात धस्स करणारी घटना घडल्याने गावावर व परिसरावर शोकाकूळ पसरली आहे.

Breaking News, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED