आवश्यक तेथे उपाय योजना करून अतिवृष्टी भागात सरसकट पंचनामे करावेत

🔸आढावा बैठकीत आ.आजबे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.7सप्टेंबर):-गेल्या आठ दिवसापासून आष्टी तालुक्यातील काही मंडळांमध्ये ६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.त्यामुळे रस्ते,पूल,घरांची पडझड व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ते उपाय योजना राबवाव्यात व अतिवृष्टी भागामध्ये तात्काळ सरसकट पंचनामे करावेत.एकही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना आ.बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आष्टी तहसील कार्यालय येथे आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे काका यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुसकानी बाबत सर्व विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी बोलतांना आ.आजबे यांनी सांगितले की,मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी होत आहे.अधिकाऱ्यांनी फक्त पाहणी करून भागणार नाही तर आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात.अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये.ज्या गावांमधील वाडी-वस्ती यांना जोडणारे रस्ते,पूल वाहून गेले आहेत त्याची पाहणी करून ते तात्काळ दुरुस्त करावेत,अतिवृष्टीमुळे काही भागांमध्ये विद्युत चे खांब पडून त्या भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.तो तात्काळ दुरुस्त करावा,जलसंधारण व इरिगेशन विभागाने सर्व पाझर तलाव,साठवण तलाव,गाव तलावची पाहणी करून त्यांची सध्याची स्थिती तपासावी,नुकसान झाल्यावर पळापळ करण्यापेक्षा त्यावर उपाय योजना करा म्हणजे होणारे नुकसान टाळता येईल.

सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे.६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस ज्या भागामध्ये झाला आहे तेथे सरसकट पंचनामे करून अहवाल अहवाल सादर करावा म्हणजे मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना देत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत,यावेळी माजी जि.प.अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे ,नीलिमा थेऊरकर,इंजि.अशोक खेडकर,इंजि,लोकरे साहेब,इंजि. प्र.काकडे साहेब,इंजि.पालवणकर,इंजि.गीते,
इंजि.सौदागर,इंजि.पी ई तळेकर,इंजि.पवार साहेब,पोलीस निरीक्षक सलीम चाऊस,उपविभागीय अभियंता माळी साहेब,इंजि.एस.डी.मुंढे,इंजि.डी.पी.जाधव,एम.के.कुलकर्णी,औदुंबर खिलारे,युवक तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले,सुधीर जगताप,संदीप आस्वर,मुळीक सर,बबन रांजणे,सिद्देश्वर झंजे यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED