खामगाव येथे मौसमातिल पहिला पाऊस

32

🔹तर खामगावकर सुखावले

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.7सप्टेंबर):-यावर्षी जुन महिन्यापासुन पाण्यासाठी आजपर्यन्त ढगाकडे आस लावून बसलेला होता.आज सकाळी पाच वाजेपासुन मेघगर्जनेसह धोधो विजांच्या कडकडांसह कोसळला.खामगाव शहराच्या मध्यभागातुन वाहणारी बोर्डीनदीला पुर आला शहरातुन वाहणारे नाली व नाले तुडुंब भरुन वाहत होते.अचानक कोसळणार्या पावसाने जनावरांचे हाल झाले.तर विहिरीमध्ये असलेल्या विद्युत मोटारी पाण्यात बुडाल्या.काही घरामध्ये व दुकानात पाणी शिरले.शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.

या पडलेल्या मौसमातिल पहिल्यापाऊसाने काहि प्रमाणात पिण्याच्या पाण्याची तसेच मान टाकलेल्या पिकामध्ये जिव निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला.शहराच्या मध्यभागाला जोडणारा बोर्डीनदीवरिल पुलाला पाण्याने व्यापल्याने खामगावकर जनतेसह खामगावशहराचे विशेषता फरशी,सुटाळपुरा भागातिल नगरसेवक देवेद्रदादा देशमुख यांचेसह विविध राजकिय पदाधिकारी यांनी फरशीपुलावर भेट देऊन पाहणी केली.काही नुकसान झाले का याची खातरजमा केली