गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हान

22

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7सप्टेंबर):-तालुक्यात नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हान तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी केले आहे.कारण कि सतत धार पाऊस सुरु असल्या मुळे गोदावरी नदी पात्रास मिळणारे सर्व ओढे-नाले यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे तसेच नदी पात्र तुंडूब भरून वाहत असल्या मुळे गोदावरी नदी काठावरील सर्व नागरिकांना तसेच गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील असलेले गावातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की गोदावरी नदी काठावरील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू असल्याने आणि माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे.त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

तसेच गोदावरी नदी पात्रास मिळणारे ओढे-नाले यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे या ओढ्याच्या काठावरील गावातील नागरिकांनी ही दक्षता घ्यावी.तेव्हा गोदावरी नदीकाठच्या गावाना या जाहीर आवाहनाव्दारे सूचीत करण्यात येते की नदीपात्रातील चल मालमत्ता,चीज वस्तु,वाहने, जनावरे, पाळीवप्राणी , शेती आवजारे व इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे व नदीपात्रात कोणीही जाऊ नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.असे आव्हान तहसीलदार गंगाखेड यांनी केले आहे