झोपुयो पात्र, कोण आहेत रमेश लटके?

30

पॉकेट क्र. ५, परिशिष्ट २ अ.क्र. ६३९

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.7सप्टेंबर):-झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात माहिती अधिकारातून असे समजले की रमेश लटके नावाच्या व्यक्तीची पात्रता सिद्ध झाली आहे कोण आहेत हे रमेश लटके?*

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी माहिती अधीकारातून मिळवलेल्या शासकीय दस्ताऐवजात असे आढळून आले आहे की, पॉकेट क्र. ५, परिशिष्ट २, अ क्र ६३९ याची पात्रता सिद्धता रमेश लटके या नावाने झाली आहे, पुढे महामंडळाने दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, करारनाम्यातील तरतुदीनुसार (पान क्र. ३०, कलम ४.१) विकासकाने सर्वेक्षण करून झोपडीधारकांच्या कागदपत्रावरून मूळ परिशिष्ट तयार करून महामंडळास सादर केले व त्यानुसार महामंडळाने पत्र क्र. ३९१ दि. १०/०२/१९९९ रोजी सदर परिशिष्ट क्र. २ यास मंजुरी पारित केली. या सर्व पात्र झोपडीधारकांची कागदपत्र विकासाकाकडे असून महामंडळास त्यांनी सादर केलेली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाच्या तळाशी जाऊन ही व्यक्ती जर लोकप्रतिनिधी असलेले व्यक्तित्व असेल तर अश्या लोकप्रतिनिधी च्या विरोधात उभे राहून एस आर ये प्रकल्पातील मूळ झोपडी धारकांना सदनिका मिळवून देण्यासाठी आंदोलन उभे करणार व असे प्रकार अजून किती ठिकाणी केले आहेत, मूळझोपडी धारक व त्यांचा मूलभूत हक्क हिरावून घेतला आहे याचा शोध घेणार असल्याचे डॉ. माकणीकर यांनी सांगितले.

सत्तेत राहून जनतेचे हित न साधता स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्याना जनता वेळीच धडा शिकवेल पण रिपाई डेमोक्रॅटिक अश्या प्रवृत्तीना नागडे करेल शिवाय या प्रकरणाची तक्रार विधान सभा व परिषदेच्या मा. अध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांना करण्यात येईल अशी प्रतिक्रिया डॉ. राजन माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड या दोन पँथर्स नि दिली आहे.