अनंत आयकॉन प्रोडक्शन निर्मित तू विघ्नहर्ता हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार …….

27

✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गणेशोत्सवाला मोजकेच दिवस शिल्लक असून सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या आनंददायी वातावरणावर अधिक भर टाकणारे गाणे अनंत आयकॉन प्रोडक्शन निर्मित ‘तू विघ्नहर्ता’ हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या गाण्याचे पोस्टर झळकले असून त्याला गणेश भक्तांकडून भरभरून प्रतिसाद मिळात आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा अधिक न वाढवता हे गाणे लवकरच भेटीला येणार आहे.

अभिनेता प्रसाद सोनवणे सह बाल कलाकार सावरी वाघमारे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले सुमधुर गाण्याला रॉकसन यांनी आवाज दिला आहे. तर रॉकसन यांनीच गाणे शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचे संगीत निरंजन पेंडकर, निर्माता म्हणून अनंत भोर तर दिग्दर्शन वरुणराज मोरे यांनी केले आहे. तसेच गाण्याचे प्रमुख व्यवस्थापन तेजस शिरसाठ , प्रोडक्शन व्यवस्थापन अविनाश तौर, यश आरोटे, प्रमोद व इतर कलाकार यांनी काम केले.

आपल्या लाडक्या बाप्पावर ‘तू विघ्नहर्ता’ हे गाणे आधारित असले तरी या गाण्याला एक कथा आहे. आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने करतो. आणि कितीही मोठे संकट आले तरी आपला पालनकर्ता हा विघ्नहर्ता हा आपला गणरायाच आहे. त्याचप्रमाणे या गाण्यातील भावा बहिणीचे प्रेम दाखवण्यात आले आहे. कितीही मोठे संकट आले तरी बहिणीसाठी आपला भाऊच पाठीराखा असतो. हे या गाण्यात दर्शविले आहे. त्यात मनात श्रद्धा असेल तर त्याची जोड अधिकच मजबूत होते. आजच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात कोव्हिड सारखी महामारी आलेली आहे. त्याच बरोबर नियंत्रणासाठी वेगवेगळ्या संस्था , महाराष्ट्र शासन हे त्यावर काम करीत आहे.

पण त्याच बरोबर लसीकरण व काही ठिकाणी काळाबाजार चालत आहे त्यावरच आळा घालण्यासाठी व गाण्यातून मनोरंजनासोबत समाज प्रबोधन देखील होणार आहे. ही छोटीशी कथा या गाण्यात अतिशय सुरेख पद्धतीने मांडण्यात आली आहे. गणपतीच्या इतर गाण्यांपेक्षा हे गाणे जरा वेगळे आहे. गाणे जरी वेगळ्या पद्धतीने सादर केले असले, तरीही बाप्पाविषयी असलेल्या प्रेमाची भावना तितकीच मनापासून आहे. अतिशय गोड आणि आनंद निर्माण करणारे हे गाणे भक्तांना बाप्पाच्या भक्तीत तल्लीन करणारे आहे.