चामोर्शी: -मारकंडा (कं) येथील शेतकऱ्यांनी मंदिरातील नंदिची पूजा करून बैल पोळा केला साजरा

24

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.7सप्टेंबर):- कृषिप्रधान संस्कृती मधला आनंदी आणी महत्वाचा उत्सव म्हणजेच बैलपोळा ,
बैलपोळा हा उत्सव सर्व शेतकरी गेल्या वर्षानुवर्षे गांवा गांवात सर्जा राज्याच्या सन साजरा केला जातो म्हणजेच बैलपोळा साजरा करण्याची परंपरा फारच पूरातन असुन हि परंपरा अजूनही कायम स्वरूपी सुरु आहे .

मात्र शासनाने कोरोणा संकटाला रोखण्यासाठी बैल पोळा मिरवणूकीला निर्बंध आणल्याने शासनाचे नियम पाळत मारकंडा (कं) येथील शेतकऱ्यांनी बैलांची मिरवणूक न काढता मार्कंडा (कं) येथील जगन्नाथ बाबा मंदिराच्या मट स्थानातील नंदी ची पूजा करून बैलपोळा सण साजरा करण्यात आला यावेळी मार्कंडा (पकं) येथील शेतकरी श्री डॉक्टर प्रभाकरराव पंदिलवार श्री नानाजी बिटपलीवार श्री गंगाधरजी पोटवार श्री विजय बहिरेवार श्री संजीव गोसावी श्री संजय राव पंदीलवार प्रभात मंडल गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते