माण तालुक्यात तालुकास्तरीय ‘बुद्धविहार’ निर्माण करण्याचा संकल्प; बुद्धविहार निर्माण होणारच – अरुण बनसोडे

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण) मोबा.9075686100

म्हसवड(दि.7सप्टेंबर);-भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुक्याच्या वतीने माण तालुक्यात ‘बुद्धविहार’ निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुका अध्यक्ष अरुण बनसोडे यांनी सांगितले त्याच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन म्हसवड येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस तालुक्यातील धम्मबांधव,कार्यकर्ते याची उपस्थिती मोठ्याप्रमात होती.

यावेळी बोलताना अध्यक्ष अरुण बनसोडे म्हणाले माण तालुक्यात बुद्धविहार कुठेच नाहीत ज्या ज्या गावामध्ये धम्मबांधव आपल्या कार्यक्रमासाठी एकत्र येतात ते समाज मंदिर असून धम्म बांधवांना बौद्ध धम्मानुसार येणाऱ्या कार्यक्रमाला व बुद्ध वंदना घेण्यासाठी बुद्धविहार नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे.ही अडचण दूर करण्यासाठी तालुक्यात एक प्रशस्त बुद्धविहार असणे गरजेचे आहे ज्यात धम्म बांधव विपश्यन्या करू शकतात धम्माचे कार्यक्रम,शिबिरे घेऊ शकतात,तरुण मुलांना आपले शिक्षण आणि भविष्य घडविण्यासाठी या विहारात एक सुसज्ज ग्रँथालय असले पाहिजे याकरिता तालुक्यात विहार बांधणे गरजेचे आहे.

त्यासाठी तालुक्यातील धम्म बांधवांचेकडून धम्मदान स्वीकारून हे विहार उभे करण्याचे ठरविले आहे.
या संदर्भात दुसरी महत्वपूर्ण बैठक रविवार दि.12 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन,म्हसवड येथे आयोजित केली असून पुढील नियोजन केले जाणार आहे त्यासाठी धम्म बांधवांना आवाहन करतो की जास्तीत जास्त धम्म बांधवांनी या बैठकीस हजर राहावे.या बैठकीस कुमार सरतापे(बौधाचार्य),आबासाहेब बनसोडे(बौधाचार्य),पिटु बनसोडे(बौधाचार्य),मा.नगरसेवक अगुली बनसोडे,एल.के.सरतापे,आबा बनसोडे,गायकवाड,सचिन सरतापे (तालुका सचिव, आदी धम्म बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED