उज्ज्वलामुळे ग्रामीण भागात पसरला अंधार

🔹शिधापत्रिकेतुन केरोसीन गायब

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.7सप्टेंबर):-केरोसीनसाठी ग्रामीण भागातील जनता दाहीदिशा वणवण भटकत असल्याचे चित्र दिसून येत आहे .शासनाने उज्ज्वला गॅस वाटप करून गरिबांच्या शिधापत्रिकेतून केरोसीन कायमस्वरूपी हद्दपार केल्याची नोंद घेतली असल्याने ग्रामीण भागात केरोसीन मिळणे दुरापास्त झाले आहे .त्यातच विजेच्या अवाजवी बिल सर्वसामान्यासाठी भरणे कठीण होत आहे .परिणामी ग्रामीण भागात सर्वत्र अंधार पसरला असल्याचे विदारक वास्तव दिसून येत आहे .सध्यस्थितीत प्रगत तंत्रज्ञानाने घरोघरी विजेचा पुरवठा करण्यात आला आहे .त्यामुळे घरातील केरोसीनचे दिवे बंद झाले आहेत .मात्र विजेच्या वाढीव दराने व दरमहा येणारे भरमसाठ वीज देयकाने गरिबांचे कंबरडे मोडले आहे.

हातावर आणून पानांवर खाणाऱ्या कुटुंबाचे चरीचार्थ करणे शक्य होत नाही त्यात भरमसाठ वीज बिल कसे भरणार त्यामुळे वीज वितरण कंपनी थकीत वीज देयकांसाठी वीज पुरवठा खंडित करीत असतात त्यामुळे अनेकांच्या घरातील उजेड नाहीसा झाला आहे .आता त्यांच्याकडे केरोसीन नसल्याने घरात अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे विदारक दृश्य ग्रामीण भागात दिसून येत आहे .शासनाने घरोघरी उज्ज्वला गॅस मोफत पुरवठा केला आहे .धुरमुक्त घर करण्याचा व जंगलाची होणारी तोड कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे .मात्र गॅस पुरवठा झाल्यावर कुटुंबाच्या शिधापत्रिकेतून केरोसीन कमी करण्याचा नियम असल्याने बहुतेक शिधापत्रिकेतून केरोसीन कायमचे हद्दपार झाल्याचे दिसत आहे .त्यामुळे ग्रामीण भागात केरोसीन तुडवडा निर्माण झाला आहे.

घरात गॅस कनेक्शन ,वीज पुरवठा तरी महागाईच्या भडक्याने अनेकांच्या घरातून स्वयंपाकाचा धूर निघणे कठीण जात आहे अशातच घरी केरोसीन नसल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला की रात्रौभर अंधारात राहावे लागत आहे .त्यामुळे किमान एका कुटुंबाला पाच लिटर केरोसीन शिधापत्रिकेवर देण्यात यावा तसेच एखादेवेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी केरोसीनची अत्यंत गरज भासत असते अशा वेळी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे घरात गॅस उपलब्ध झाल्याने घरातील अंधार मात्र नाहीसा होण्याऐवजी अंधाराच पसरताना दिसून येत आहे .

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED