कृष्णगीतानगर मधील रस्त्यांची दुर्दशा !…

🔹रस्त्यांकडे प्रशासनाचे होतयं दुर्लक्ष !….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगांव(दि.7सप्टेंबर):-धरणगाव नगर परिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झालेली आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत अशा परिस्थितीत मातीच्या रस्त्यांची पूर्णतः वाट लागलेली आहे.

कृष्ण गीता नगर कॉलनिवासीयांच्या वतीने वारंवार धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आबासाहेब निलेश चौधरी तथा न.पा. मुख्याधिकारी, व नगरसेवक किरण मराठे यांना वारंवार सांगून – निवेदने देऊन देखील रस्त्यांची डागडुजी केली जात नाही. आईन पावसाळ्यात रस्त्याची फार वाईट अवस्था झालेली आहे.

लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालून रस्त्यांची डागडुजी करून मुरूम टाकावा अशी अपेक्षा कॉलनीवासीयांकडून होत आहे. याप्रसंगी कॉलनीचे ज्येष्ठ नागरिक बी.एम. सैंदाणे, प्रल्हाद विसपुते, जे.एस.पवार सर, महेंद्र सैनी, गोकुळ महाजन, , बाळू अत्तरदे , संजय सुतार , एस.एन.कोळी सर, पी.डी.पाटील सर उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED