गंगाखेड शहर झाले जलमय

67

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7सप्टेंबर):-येथे सात सप्टेंबर मंगळवार रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे गंगाखेड शहरात अनेक ठिकाणी तळ्याचे चित्र निर्माण झाले होते.

अनेकांच्या घरामध्ये नाल्याचे पाणी घुसले असून गंगाखेड शहराचा मुख्य रस्ता, जनाबाई कडे जाणारा रोड, संत मोतीराम महाराज मंगल कार्यालय, परळी नाका, शिव कॉलनी, ओम नगर, भंडारा कॉलनी,स्टेट बँक ऑफ इंडिया, उप जिल्हा रुग्णालय, अहिल्याबाई चौक समोरील व्यापारी संकुलन चा तळभाग, बसस्थानक,उडान पूल,एम.यस. ई. बी. कार्यालय,इत्यादी अनेक ठिकाणी छोटे तलाव सारखे चित्र निर्माण झाले होते तसेच गंगाखेड शहरातील काही ठिकाणी तेथील रहिवाशांनी स्वता जेसीपी आणून तुंबलेल्या नाल्या काढल्या परंतु शासकीय मदत मिळालेली दिसून आली नाही ऐका जोरदार पावसा मुळे गंगाखेड शहराचे विदारक चित्र दिसून आले