मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत…

31

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.7सप्टेंबर):- शहर व परीसरात गेल्या दोन दिवसापासुन सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.सतत दोन दिवसापासुन मुसळधार पाऊस पडत असल्याने नांदेड बेस लगत असलेल्या भोर तलाव तुडूंब भरून वाहत आहे.नांदेड बेस हे मुख्य रस्ता असुन या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने नागरीकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.या रोडवर काही नागरीकांनी घरकुल बांधकामासाठी वाळु साठवून ठेवले होते.या दोन दिवसापाुन सततच्या मुसळधार पाऊसाने सर्व वाळू वाहून गेली.व शहरातील ब-याच ठीकाणी घरात पाणी शिरले तर काही ठीकाणी घरे पडली आहेत.

याशिवाय दौलापूर,कोटग्याळ,माचनूर,हरनाळी,नागणी या ग्रामिण भागाचा संर्पक तुटला असुन हजारो हेक्टर जमिन पाण्याखाली गेल्याने उडीद, सोयाबीन,तुर,कापूस मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतक-यातुन होत आहे.