शेती पिंकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान,बांधावर जाउन तातडीने पंचनामे करा –सतिश मुंडे

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.8सप्टेंबर):- काल रात्री पासून तालुक्यात जोरदार पाऊसाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील अनेक ठिकाणी नदीं नाल्यांना पुर आला आहे. तसेच शेतीच्या पिकांत पाणी साचून व पिकांत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने नुकसानीचे बांधावर जाउन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केली आहे.

         तालुक्यातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून ठिकठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.   तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने झालेल्या नुकसांनीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सतीश मुंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED