पारडगावी साजरा ग्रीन पोळा

🔸गावातील तरुणांनी वृक्ष लागवड करून केला अनोखा पोळा साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8सप्टेंबर):-आज 7/09/2021 ला पारडगाव येथे “युवा ग्रीन आर्मी” तर्फे गावातील तरुणांनी स्मशानभूमीत तसेच गावातील हनुमान मंदिर जवळ वृक्ष लागवड करण्यात आली.

अतोनात होणारी वृक्षतोड मुळे पर्यावरणीय समतोल राखणे काळाची गरज आहे, याचीच जाणीव ठेवून गावातील काही सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन संपूर्ण गाव हिरवगार करण्याचा संकल्प केला आणि कुठल्याही शासकीय मदतीची वाट न बघता स्वयम् आर्थिक तरतूद करून गावात वृक्ष लागवड करत आहेत यावरषीच शिव जयंतीला सुधीर ठेंगरि या तरुणाने १०० वृक्ष लागवड करून व त्याच व्यवस्थित संगोपन करून एक आदर्श गवापुढे ठेवलं. गावातील स्मशानभूमी पूर्णतः वृक्ष विरहित होत असताना आणि नाल्या ची दरड खचत होती.

अश्या वेळी पोळा सणाचे औचित्य साधून ज्ञानगंगा विद्यालय बेटाला चे मुख्यध्यापक विष्णुजी तोंडरे, वीज वितरण कर्मचारी विजय दिवठे, गावचे सरपंच पिंटू पिल्लेवान, पंचायत समिती कर्मचारी सुधीर ठेंगरि, रोजगार सेवक मनीष गिरी, कृषी मित्रं राजू ढोरे, कोतवाल आदित्य तोंडरे, जयदेव कार, सुभाष बगमारे, सूरज बगमारे, प्रफुल ठेंगरी, दिपक मेश्राम, पवण मेश्राम, पारडंगाव रक्तपेढीचे संचालक मंगल पारधी, मोरुजी दोनाडकर यांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड केली.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED