मौजे जांब येथील मागासवर्गीयासाठीचे 15 टक्के अनुदान न देणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी- गणेश भोसले

26

✒️सचिन सरतापे (प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8सप्टेंबर):-मौजे जांब,ता.खटाव,जि. सातारा येथील मागासवर्गीय अनुसूचित जाती(बौद्ध) वर्गास गेली 5 वर्षे मागासवर्गीयांसाठी असणारे 15 टक्के अनुदान दिले गेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे मागील 5 वर्षाचे रेकॉर्ड उपलब्ध नाही असे सांगितले आहे. तसेच आम्ही व समाजातील नागरिकांनी लेखी देखील मागणी केली होती त्याचे कोणते उत्तर दिले नाही. तरी संबंधित ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या संबंधीचे निवेदन रिपाईच्या वतीने गटविकास अधिकारी,पंचायत समिती खटाव यांना देण्यात आले.

मागासवर्गीयांच्यासाठी असणारे आजपर्यंतचे अनुदान त्या त्या वर्गातील लोकांना त्वरित द्यावे. तसेच तालुक्‍यातील काही ग्रामसेवक मागासवर्गीय समाजातील ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांना विचारात न घेता परस्पर मागासवर्गीयांचे अनुदान योजना इतरत्र वर्ग केली जात आहे.अशा ग्रामसेवकावर मागासवर्गीय अनुदान व निधी वाटपा बाबतच्या प्रकरनाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. आपल्या स्तरावर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना लेखी आदेश काढावे की मागासवर्गीय अनुदान निधी इतरत्र योजना राबवत असताना समाजातील प्रतिष्ठित नागरिक व सदस्यांना विचारात घेऊन करावे‌. वरील बाबींचा विचार करून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. हे निवेदन देताना रिपाईचे (आठवले) गटाचे खटाव ता.कार्याध्यक्ष गणेश भोसले, जिल्हा नेते अजित नलावडे, मयुर बनसोडे, नेते दत्ता शिंदे, महेंद्र माने, संदीप काळे, जितेंद्र सोनवले, चरणदास सोनवले, अमोल रणदिवे उपस्थित होते.