कोराना काळात कंत्राटी पद्धतीने काम करणारे कार्यमुक्त केलेले आरोग्य कर्मचारी पुन्हा कामावर घ्यावेत- ऍड. राजू भोसले

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8सप्टेंबर):-महाराष्ट्र शासनाने कोराना काळात कंत्राटी पद्धतीने काम करणारे आरोग्य कर्मचारी कार्यमुक्त केले असून कोविड रुग्णांना जीवदान देणारे कंत्राटी कर्मचारी पुन्हा कामावर घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या चिंतन शिबीर बैठकी मध्ये महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, व संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री संजय बनसोडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव अ‍ॅड . राजू भोसले यांनी निवेदन देवून केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांचे चिंतन शिबिर लोणावळा या ठिकाणी संजयजी बनसोडे साहेब, महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयदेव गायकवाड व प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव अ‍ॅड. ‍ राजू भोसले व इतर प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित पार पडले .

यावेळी अ‍ॅड. राजू भोसले यांनी म्हसवड व सातारा जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यातील कोविड काळात काम केलेले कर्मचारी डॉक्टर, नर्सेस , वॉर्डबॉय , स्वच्छता कर्मचारी यांच्या कामाची दखल घेवून तसेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचार करून त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे निवेदन संसदीय कार्य मंत्री संजय बनसोडे यांना देवून मागणी केली.तसेच अ‍ॅड. राजू भोसले यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या संघटनात्मक बांधणी बाबत केलेल्या भाषणाची विशेष दखल घेऊन संसदीय कार्य मंत्री ना. संजय बनसोडे यांनी त्यांचे भाषणात कौतुक केले.