तुकारामाची गाथा हा पाचवा वेद असला तरी गाथा पांडुरंगाचीच वाणी आहे – समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर

🔹वै.ह.भ.प.दशरथ आण्णा जगताप महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंताचा सत्कार संपन्न

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.8सप्टेंबर):-लाचार झालेल्या समाजाला फक्त स्तुतीच आवडते.स्तुती ही विनशाकडे घेऊन जाते.आपली टिका अथवा आपल्या चुका सांगणारा खरा मित्र असतो.हरिभक्तांची स्तुती केली पाहिजे.निंदा करुन पाप लागते.जिथे भोग आहे तेथे रोग आहे.माणसाने देव पाहायचा नाही तर माणसाने देवासारखे व्हावे यासाठी संत तुकाराम महाराजाने गाथा सांगीतली.या विश्वात कोणतीच गोष्ट विनाकारण नाही.गाथेत विविध प्रकारची अभंग आहेत.उपदेश,नामपर,विनंतीपर,विनवणीपर आणि जनाला आणि मनाला उपदेश करणारी अभंग आहेत.संत तुकारामाची गाथा हा पाचवा वेद असला तरी गाथा पांडुरंगाचीच वाणी आहे असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रीनाथ जगताप,माजी सरपंच रामदास जगताप आणि अर्जुन जगताप यांचे वडील वै.ह.भ.प.दशरथ आण्णा जगताप यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजीत कीर्तनात ते बोलत होते.यावेळी इंदुरीकर म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे.ज्ञानेश्वर माऊली ही आई तर संत तुकाराम महाराज हे वडील किंवा जगदगुरु आहेत.राष्ट्रपुरुषांचे नावे धाब्याला नसावेत.शाळा,मंदीर स्वच्छ ठेवा.ज्या गावची शाळा चांगली,मंदीर चांगले तेथे संस्कार चांगले होतील.धर्मावर निष्ठा असणारे वेगळे आणि धर्मावर निष्ठा नसणारे वेगळे असतात.आध्यात्म व विज्ञान हे एका नाण्याच्या दोन बाजु आहेत.जगात ईश्वरी शक्ती आहे हे सर्वांना मान्यच करावे लागेल.अपघाती मृत्यू हे कर्माची फळ आहे.कोरोनामुळे मांसाहारी वाढले.दारु पिणा-यांची संख्या वाढली.पैशावाली माणसं यांना धर्म कळत नाही परंतु त्यांना पैशामुळे किंमत असते.पारतंत्र्यातील जगणं काही खरं नाही.वारकरी कधीच कोरोना पाॕझिटिव्ह होणार नाहीत.

गळ्यातील पवित्र तुळशीमाळ काढुन मांसाहार करणारे तिसऱ्या लाटेत जिवंत राहणार नाहीत.पापाची संपत्ती कमविण्यापेक्षा गरीब रहा,संस्कृती जपा,सुसंस्कारी रहा असे सांगत आपल्या आईवडीलांनी आपल्याला श्रीमंती दिली नाही परंतु संस्कृती दिली हे लक्षात ठेवा असे सांगीतले.अंत्यविधीतील राख शेतात आणुन खड्ड्यात टाकुन झाड लावा.त्यामुळे आईवडीलांची आठवण राहील.नदी अस्वच्छ होणार नाही.एक व्यक्ती एक झाड केले तरच पर्यावरणाचे संतुलन राहणार आहे.काही लोकांनी तर पर्यावरण व धर्म याचे भांडवल केले.पर्यावरण कृतीने वाढवावे लागेल भाषणाने होणार नाही.जेवण्याच्या पध्दती बदलल्या परंतु अजुनही तोडांनेच जेवावे लागते.तमोगुणाकडुन सात्त्विक विचाराकडे घेऊन जाणारी चांगली बुध्दी असते.बुध्दीचे ९ प्रकार आहेत असे ह.भ.प.इंदुरीकर महाराज शेवटी म्हणाले.
यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले की,सभापती बद्रीनाथ जगताप यांनी आईवडीलांची चांगली सेवा केली आहे.संतपरंपरेची आवश्यकता आहे.बिहारात संत जन्मले नाहीत म्हणुन तेथील दादागिरीचे वातावरण आहे.वै.ह.भ.प.
दशरथ आण्णा जगताप यांनी पैसे कमविले नाहीत पण माणसं कमविले.त्यांनी वारकरी विचाराची दिशा दिली आणि आदर्श परिवार घडविला असे माजी आ.दरेकर म्हणाले.
युवानेते जयदत्त धस म्हणाले की,कोरोना महामारीत जगताप कुंटुंब सापडले होते.त्यात वै.ह.भ.प.दशरथ आण्णा जगताप हे एक वर्षापुर्वी गेले.जेष्ठ व्यक्तीमत्व आणि वारकरी संप्रदायातील मोठे नाव होते.पंढरपूरचे वारकरी होते.पंढरपूर,पैठण,आळंदी पायी दिंडीत ते जात असत असे सांगीतले.

यावेळी डाॕ.शिवाजी राऊत,प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,ॲड.बाळासाहेब झांबरे,ह.भ.प.शिवाजी महाराज जगताप,ह.भ.प.अशोक बळे,ह.भ.प.अगंद महाराज,अशोक महाराज भोसले,ह.भ.प.आदिनाथ महाराज झांबरे,गोरख महाराज झांबरे,डाॕ.विलासराव सोनवणे,तबला वादक ओम महाराज नन्नवरे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,बीड जि.प.माजी सदस्य देवीदास धस,जि.प.चे अध्यक्ष डाॕ.शिवाजी राऊत,अमरराजे निंबाळकर,रामहरी महारनवर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,युवानेते जयदत्त धस,बबनआण्णा झांबरे,माजी सभापती अशोक ईथापे,आदिनाथ सानप,काकासाहेब शिंदे,उपसभापती रमेश तांंदळे,भारत मुरकुटे,सुनिलदादा रेडेकर,अमोलराजे तरटे,संदीप खाकाळ, मोहनतात्या झांबरे,अशोक गर्जे,राधाकिसन सिरसाट,रंगनाथ जगताप,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,गणेश शिंदे,माजी सभापती दत्तात्रय जेवे,दत्ताभाऊ काकडे,रावसाहेब लोखंडे,संजयदादा आजबे,गंगाआबा आजबे,संजय गाढवे,अशोक मुळे,भगवानराव शिनगिरे,सतीशशेठ धस,तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर,प्रभारी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,आत्मराम फुंदे,अमोल शिंदे,बाळासाहेब मेहेर,विनोद रोडे,प्रकाश कोकणे,शरीफ भाई,रघुनाथ आवारे,राजेंद्र दहातोंडे,भाऊसाहेब भवर,बाळासाहेब निकम,अनिल वांढरे,सुरेश बक्षी,राजाभाऊ धनवडे,अशोक मुळे,सय्यद रिजवान,आदिनाथ मिसाळ,हौसराव आजबे महाराज,सरपंच दिगांबर पोकळे,प्रविण पोकळे,सोपान केरुळकर,पैलवान मुरलीधर फसले,रावसाहेब मुटकुळे,शिवाजी पांढरे,मुख्याध्यापक महेश शिंदे आदि सामाजिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विठ्ठल तोरडमल सर यांनी केले.उपस्थित मान्यवर व जनतेचे सभापती बद्रीनाथ जगताप यांंनी आभार मानले

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED