आमदार सुभाष धोटे यांना मुस्लिम समाजाच्या मागणी घेऊन भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या वतीने निवेदन

31

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(प्रतिनिधी तालुका,जिवती)

जिवती(दि.8सप्टेंबर):-तालुका स्तरीय आढावा सभा आज दि. ८ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती या सभेचे अध्यक्ष राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष भाऊ धोटे होते जिवती तालुक्यातील शेणगांव येथील मुस्लिम सामाजच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात मुस्लिम समाजासाठी मुस्लिम समाज भवन- मुस्लिम ग्रंथालय-कब्रस्तानाला संरक्षण भिंत-जनाजा नमाजपठण करण्याकरिता खुले सभामंडप- आणि शाही ईदगाहला ईदची नमाज पठण करण्याकरिता ईदग्यावर जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता अशी मागणी करण्यात आली मुस्लिम समाजाचे धार्मिक, सामाजिक,व शैक्षणिक भावना व गरजा समजून घेऊन मुस्लिम समाजातील रास्त मागणीला आपण लक्ष वेधून आमची मागणी मान्य करून पुर्ण करावी इत्यादी मागणी चे निवेदन भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी दिले या या मागणीला आमदार सुभाष धोटे यांनी आपली मागणी लवकरात लवकर करुन देण्याची आश्वासन दिले.

तालुका स्तरीय आढावा सभेत जिवती पंचायत समितीचे सभापती अंजना पवार, तहसीलदार अतुल गांगुली, नगरपंचायत चे मुख्याधिकारी मॅडम, अन्नपुरवठा विभागाचे गंभीरे मॅडम, तालुका अन्नपुरवठा अधिकारी मेश्राम साहेब , भिमराव पाटील मडावी,काॅग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गणपत आडे, सुनील मडावी, सुग्रीव गोतावळे, माजी सरपंच कलीम शेख,ताजुदीन शेख, दक्षता समिती चे सदस्य, स्वत धान्य दुकानदार, तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते