आष्टीत पठाण कुटुंबाचे सततधार पावसाने घर जमीनदोस्त

🔹जिवीतहानी टळली मात्र घरासह लाखो रुपयांचे नुकसान

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.9सप्टेंबर):-तालुक्यातील आष्टी परीसरात आठ दिवसा पासून सततधार पाऊस पडत असल्याने आष्टी ग्रामपंचायत अंतर्गत राहत असलेले हमीद नजीर खान पठाण यांचे घर पडून पूर्ण जमीनदोस्त झाले आहे. यात लाखो नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही मात्र घरासह जीवनावश्यक वस्तू चे फार मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस सरचिटणीस संजयराव पंदिलवार यांनी घटना स्थळावर जावून घटनेची पाहणी केली.

हमीद पठाण हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते या सततधार पावसामुळे राहते घर पूर्णपणे जमीनदोस्त होऊन यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने पठाण कुटुंबावर मोठी आपत्ती निर्माण झाली आहे करीता शासनाकडून या आपत्तीग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर नूकसान भरपाई देण्यात यावी व पंतप्रधान योजने अंतर्गत घरकूलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजयराव पंदिलवार व सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य यांनी केली आहे

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED