उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची मिटिंग संपन्न

7

🔸आगामी सण आणि उत्सव सर्व मिळून शांततेत पार पाडू

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड (दि. 8अगस्ट) शहरातील पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची मिटिंग संपन्न.शहरात आगामी सण आणि उत्सव शांततेत पार पडण्यासाठी या मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील शांतता समितीच्या अनेक सदस्यांनी आपआपले मत मांडून सुचना व मार्गदर्शन केले.

शेवटी उमरखेड पोलिस स्टेशनचे नविन ठाणेदार मा. अमोल माळवे साहेब यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.ते म्हणाले की, मला याठिकाणी पारदर्शकपणे काम करायचे आहे, कायद्याच्या चौकटीत राहून सुचना व आदेशाचे पालन करणार आहे, मी कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करणार नाही.पोलीस स्टेशन हे माझे घर आहे.

नकळत माझ्या कडून चुक झाली तर मला प्रत्यक्ष भेटून किंवा कॉल करून माझी चूक सांगण्यात यावी व ती चूक सुधारण्यासाठी एक मोका देण्यात यावा.आगामी सण आणि उत्सव आपण सर्व मिळून शांततेत पार पाडूयात..! यासाठी मला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. कारण आपण सर्व या शहराच्या मातीशी जोडलेले आहेत. म्हणून आपले सहकार्य आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया मा. ठाणेदार साहेबांनी व्यक्त केली.यावेळी शहरातील शांतता समिती चे सर्व सदस्य उपस्थित होते.