कृष्णा गीता नगर मध्ये २० मोटर सायकल चे पेट्रोल व पल्सर गाडी चे पार्ट्स चोरी…..

✒️धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील ]

धरणगाव(दि.9सप्टेंबर):- २०२१ रोजी मध्यरात्री २ : ३० ते ३ वाजेच्या सुमारास काही भटक्या चोरट्यांनी कृष्ण गीता नगर परिसरातील जवळ – जवळ २० मोटरसायकल मधील संपुर्ण पेट्रोल चोरी केले एवढेच नव्हे तर अक्षय चंदाले MH -19 DN – 5671 या पल्सर गाडी चे पुढचे मॅकव्हील चोरीला गेले आणि डॉ. नन्नवरे MH – 19 D – 01963 पल्सर गाडीचे मागचे इंडिकेटर व पुढचा फेरींग ( काच ) चोरीला गेला..

सविस्तर वृत्त असे की, सकाळी सकाळी महेंद्र भाई सैनी आपली गाडी काढायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, चोरट्यांचे ठसे व गाडीचे पेट्रोल चोरीला गेले त्यांनी तात्काळ आजूबाजूला या परिसरातील कॉलनी वासियांशी फोनवर संपर्क केला तर सर्व कॉलनीवासी एकत्र आल्यावर समजले की, सर्वांच्याच गाडीतील पेट्रोल चोरीला गेले आहे व काही गाडींचे पार्ट्स सुद्धा चोरीला गेलेले आहेत.

तात्काळ कॉलनीतील पी.डी.पाटील यांनी पत्रकार बांधवांना घटनास्थळी बोलवून सत्य घटना कथन केली. याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब ऍड. भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी , जितेंद्र भाऊ महाजन व आबासाहेब वाघ यांनी घटनास्थळी येऊन कॉलनी वासियांशी हितगुज केले.

याप्रसंगी कॉलनीचे ज्येष्ठ नागरिक बी.एम. सैंदाणे, प्रल्हाद विसपुते, जे.एस.पवार, महेंद्र सैनी, गोकुळ महाजन, बाळू अत्तरदे , संजय सुतार , एस.एन.कोळी, ज्ञानेश्वर पवार, अमोल झटकर, संतोष जाधव, मनोहर बंसी, पी.डी.पाटील उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED