आतापर्यंत आरक्षण मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांनी पुढील पिढीच्या भविष्यासाठी आंदोलन करावे – भिमराव य आंबेडकर

🔹मंत्रालयावरील मोर्चात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.9सप्टेंबर):-भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षणचा लाभ मिळालेल्या सर्व लाभार्थी यांनी आता आपली पुढील पिढी घडविण्यासाठी आंदोलन करावे लागेल जेणेकरून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. जसा आताच्या सरकारवर मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी त्या समाजाचे आमदार, मंत्री सरकारवर दबाव आणत आहेत म्हणून सरकार त्यांच्यासाठी निर्णय घेत आहे तसे मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणासाठी एससीएसटी चे सर्व आमदार, मंत्री दबाव टाकत नाहीत व आंदोलनात सर्व समाजाचे लाभार्थी सहभागी होत नाहीत तोपर्यंत सरकार दखल घेणार नाह.

आंदोलन कोण करत आहे याचा सरकार अभ्यास करून दखल घ्यायची किंवा नाही हे ठरविते त्यामुळे आतापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेल्या सर्व मागासवर्गीय लाभार्थ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.भिमराव य. आंबेडकर यांनी आरक्षण हक्क कृती समिती, मुंबई विभागाच्या दि 8/9/2021 रोजीच्या डॉ.आंबेडकर भवन, दादर येथील बैठकीत केले. तसेच त्यांनी 27,ऑक्टोंबर रोजी च्या मंत्रालयावर आयोजित केलेल्या मोर्चात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल असेही आद. भिमराव य आंबेडकर यांनी सांगितले.

बैठकीत माजी खासदार मा.हरिभाऊ राठोड, मा.सुनिल निरभवणे मा.एस के भंडारे आणि मा. सिद्धार्थ कांबळे या आरक्षण हक्क कृती समितीच्या चारही राज्य निमंत्रक यांनी 27 ऑक्टोंबरचा मोर्चा हा काही केवळ पदोन्नतीतील आरक्षणाचा नसून समस्त SC,ST,DT,NT,SBC,OBC च्यासाठी विद्यार्थी शिष्यवृत्ती/फ्री शिप, नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षण , कर्नाटक सरकार प्रमाणे डिग्री पूर्व परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, नोकरीतील 4.5 लाखाचा बँकलॉग, ओबीसी ना पदोन्नतीतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण तसेच 8 तासाऐवजी 12 तास काम करण्यासारखे कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल, सरकारी विभाग व कंपन्यातील खाजगीकरण/कंत्राटीकरण , शेतकरी विरोधी कायदे, मागासवर्गीयांवरील जातीयवादी अत्याचार, कोरोना काळात मोफत रेशन व बारा बलुतेदारांना आर्थिक सहाय्य इत्यादी मागासवर्गीय – बहुजन समाजाच्या विविध मागण्यासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्या येणार असून त्यासाठी मुंबईमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वतीने प्रत्येक कार्यालयात बैठका घेण्याचे ठरविण्यात येऊन मुंबई विद्यापीठ, एस टी महामंडळ, शासकीय मुद्रणालय,म्हाडा, सिडको, मंत्रालय, सेल्स टॅक्स, महानगरपालिका येथील बैठकांच्या तारखा ठरविल्या. या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव मा. दिनेश डिंगळे हे बार्टी चे महासंचालक झाल्याबद्दल व मुंबई विद्यापीठाचे डॉ. दिनेश कांबळे हे एन सी आर टी चे केंद्रीय सदस्य झाल्याबद्दल आयबीसेफ व आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने त्यांचा आदरणीय भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या बैठकीत आरक्षण हक्क कृती समितीचे मुंबई समन्वयक व विद्यापीठ संघटनेचे दिपक मोरे, शासकीय मुद्रणालय संघटनेचे प्रमोद मोरे, आणि इतरांनी धडक मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार केला बैठकीचे प्रास्ताविक ठाणे जिल्हा समन्वयक व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटनेचे डॉ महिंद्र दहिवले यांनी केले.सूत्रसंचालन व भारतीय संविधान प्रास्ताविक वाचन एस के भंडारे यांनी केले. आभार प्रदर्शन सिद्धार्थ कांबळे यांनी केले. या बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव -मा.जगदीश गवई, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष- मा.भिकाजी कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष- उत्तम मगरे तसेच कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना,महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ,मुंबई विद्यापीठ शैक्षणिक कल्याणकारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटना, शासकीय मुद्रणालय,रेल्वे, मुंबई महापालिका इत्यादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कामगार, कर्मचारी, अधिकारी,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED