एक प्रेरणास्त्रोत-पीएसआय पल्लवी जाधव मॅम यांचा संघर्षमय जीवनप्रवास व यशोगाथा..!

बालपणीच्या आठवणी या प्रत्येकाच्या जीवनातील एक अनमोल ठेवा असतो. तो ह्रदयाच्या कप्प्यात सुरक्षितपणे संग्रही असतो. अगदी असंच त्यांच्या बालपणीचं सांगायचं म्हणजे आई-वडील दोघेही शेती करायचे…गाव तसं छोटसं…गावातील लोकही चांगली…पण विचाराने जरा संकुचित होती. तिथे मुलींना शिकवल्या जात नव्हते. मुलींना शिकण्याचा चॅन्सच नव्हता. त्यामुळे गावातील 2-3 मुलीच काॅलेजला जात असावी. 10 वी झालं की, त्यांचे लग्न केल्या जायचं…त्यांच्या गावातील ब-याच मुलींचे 10-15 वर्षातच लग्न व्हायची…त्यांच्या बहिणीचंसुद्धा 15 ते 16 वर्षातच लग्न झालं. 10 वी नंतरही मुलींचं शिक्षण असतं, याची तर कुणालाही माहितीच नव्हती. शाळेत असताना त्या अभ्यासात हुशारच होत्या. 10 वी पास झाल्यानंतर काॅलेजला जाणारी त्या पहिलीच मुलगी होती. काॅलेजला 11 वीला अडमिशन (प्रवेश) घेतलं.

पण काॅलेज दूर असल्यामुळे आणि घरची परिस्थिती खराब असल्यामुळे त्यांना काॅलेजला रेग्युलर जाता येत नव्हतं. म्हणून त्या आई-वडिलांसोबत शेतात काम करायचे आणि हप्त्यातून एक वेळाच काॅलेजला जायचे…असं करतच ते आपलं काॅलेजचं शिक्षण पूर्ण केलं. आई-वडिलांनी त्यांना ग्रॅज्युएशन पर्यंतच शिकवलं होतं. पण आता तेही समाजापुढे आणि त्यांच्या टोमण्यांपुढे हतबल झाले होते. त्यामुळेच त्यांनी आता त्यांच्यासाठी लग्नाची स्थळं बघायला सुरुवात केली होती. असंच एक दिवस त्यांच्या आईंनी त्यांना लग्नाला घेऊन गेले होते. तिथे त्यांना त्यांचे काका म्हणजे आईचे काका मिळाले होते. काकांना त्यांनी सांगितलं होतं की, ही माझी मुलगी आहे. तर हिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघा! जेव्हा बाबांना म्हणजेच त्यांच्या आजोबांना हे माहित झालं, तेव्हा त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं होतं. या बोलण्यात त्यांनी त्यांच्या शिक्षणासंबंधी सर्व आढावा घेतला होता. त्याच्यानंतर ते त्यांच्या आईला बोलले की, हिचं लग्न करू नको? हिला तू आणखी पुढे शिकव! ही नक्कीच काहीतरी करेल. त्याच दिवशी त्यांनी त्यांना एमपीएससीचं मार्गदर्शन पण केलं होतं. या मार्गदर्शनानंतर त्यांना स्वप्न तर दिसत होतं. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे वडिलांना कन्विन्स करण्याचं…घरी आल्यानंतर त्यांच्या आईने वडिलांना कन्विन्स केलं.

त्यांना घराच्या बाहेर जाऊन शिकायची खूप इच्छा होती. परंतु तो संधी कधीच मिळाली नव्हती. आता, हा चान्स त्यांना मिळणार होता. परंतु अजून एक सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे पैशाचा…आर्थिक परिस्थिती खुपच बिकट असल्याने घरी त्यांना ब-याचवेळा चहाला साखर नसायची, भाजीला तेलसुद्धा नसायचं…अशा परिस्थितीत घराच्या बाहेर जाऊन शिकणं म्हणजे ही खुपच मोठी समस्या होती. मग, वडिलांना कन्विन्स केल्यानंतर त्यांनी परवानगी दिली व सोबतच दोघांनी मिळून बचत गटाकडून 5 हजार रुपये व्याजांनी काढले, जेणेकरून त्यांना बाहेर पाठवता येईल. शिक्षणासाठी बचत कटाकडून पैसे मिळाल्यानंतर 5 दिवसातच ते आपलं गाव सोडले आणि एमपीएससीच्या अभ्यासासाठी बाहेर पडले. डोळ्यात स्वप्न घेऊन घराबाहेर पडताच सरळ औरंगाबाद गाठले. तिथे आल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे त्यांनी एमएला अडमिशन (प्रवेश) घेतले. एमएला अडमिशन (प्रवेश) घेतल्यानंतर त्यांची हाॅस्टेलला राहण्याची सोय झाली.

हाॅस्टेलला एका रुममध्ये 4 मुली असायच्या..परंतु त्या काळात एका रुममध्ये 8 मुली ठेवल्या जायच्या…अशाच ठिकाणी त्या राहत होत्या. त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं ध्येय होतं की, कोणतीतरी नोकरी मिळवून गावी परत जायचं. तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की, एमपीएससी मध्ये पीएसआय ही एक पोस्ट असते आणि युनिफार्मबद्दल त्यांना अट्रॅक्शन पण होतं. म्हणून त्यांनी ठरवलं, आता आपण पीएसआयचाच अभ्यास करायचा. त्याच काळात त्यांचं एमए ही सुरू होतं आणि पीएसआयचा अभ्यासही सुरू होता. घरची परिस्थिती हलाकीची होती. आर्थिक अडचण नेहमीच असायची…त्यामुळे युनिव्हर्सिटीमध्ये ‘कमवा आणि शिका’ ही योजना होती. या योजनेमध्ये त्यांनी भाग घेतला होता. एमएचा अभ्यास सुरू केल्यानंतर त्यांचा पहिलाच रिझल्ट आला होता, तो स्टाॅफ सिलेक्शन कमिशन थ्रो सेंट्रल पीएसआयचा…हा रिझल्ट आल्यावर त्या खूप खुश होत्या. त्याच्यानंतर मेन्सची डेट आली. त्या मेन्सची चांगली तयारी करून एक्झामही दिल्या. नंतर त्यांची फिजिकलची डेट आली व त्या फिजिकलसाठी पुण्याला गेले. पश्चिम भारतातील मुलींचे फिजिकल होते. 165 मुलींमधून त्यांना पकडून 5 मुलीच शेवटपर्यंत टिकल्या नि क्वाॅलिफाय झाल्या. त्यानंतर त्या फायनल रिझल्टची वाट बघत होत्या. परंतु त्यांच दुर्दैव कि त्या कुठेतरी कमी पडल्यासारखं त्यांचा रिझल्ट 2 मार्कांनी गेला. त्या काळात ते खूप रडले. त्यांचं ते पहिलच अपयश होतं. आई-वडील त्यांना धीर देत होते की, रडू नको? अपयश ही यशाची पहिली पायरी असते. प्रयत्न करत रहा…त्यांचे वडील त्यांना दिवसातून 4 वेळा काॅल करायचे…कारण त्यांना वाटायचं की, आपली मुलगी रडते आहे. ती खचून जाईल, स्वत:चं बरं-वाईट करून घेईल. परंतु त्या काही त्यातल्या नव्हत्या…त्यांना माहित होतं की, एमपीएससीचा डोंगर सर करायचं म्हटलं तर एवढं काही सोपं नाही. त्यांच्यात प्रबळ इच्छाशक्ती होती आणि स्वप्नही त्यांचं तेवढंच जोरदार नि बळकट होतं. म्हणून त्याच दिशेने त्या वाटचाल करत होते.

त्यांची अशिक्षित आई, जी कधीही शाळेत गेली नव्हती. त्या त्यांना सांगायच्या की, बेटा! एक मुंगी जेव्हा दाणा घेऊन भिंतीवर चढते, तेव्हा ती ब-याच वेळा खाली पडते. परंतु ती भिंतीवर चढायचं सोडत नाही. त्याचप्रमाणे तूही खचून जाऊ नकोस? आज ना उद्या तुला सक्सेस मिळेलच…याच्यापुढची परीक्षा दे, तू नक्कीच यशस्वी होशील. पीएसआयच्या परीक्षेत अपयश आल्यानंतर त्या बरेच दिवस खचून गेले होते. त्यांना असं वाटत होतं की, घरातून बाहेर पडून 2 वर्ष झाली आहे. आपले आई-वडील आर्थिक खर्च किती दिवस पेलणार, त्यांनाही उन्हातान्हात कष्ट करावे लागतात. त्यांची आई 100 रुपये रोजाने लोकांच्या शेतावर कामावर जायचे व ते पैसे साठवून त्यांना पाठवायचे…कुठेतरी त्यांना खूप वाईट वाटायचं…त्यांना असं वाटायचं की, आपला रिझल्ट कधी येईल? जेणेकरून आपण स्वत:चा खर्च भागवू व आई-वडिलांचा आधार बणू…परंतु सध्याच्या काळात कोणत्याही एक्झाम्स नव्हत्या. म्हणून तेव्हा पोलीस भरतीची अँड (जाहिरात) बघून त्यांना वाटलं की, पीएसआय तर आपण होणारच आहोत, पण तोपर्यंत पोलीस भरती देऊ…ज्यामुळे आपला आर्थिक प्रश्न सुटेल व आपण आई-वडिलांना हातभार लावू…म्हणून ते पोलीस भरतीचा फार्म भरून एक्झाम दिले.

परंतु त्यांचं बॅडलक असं की, 132 मार्काला रिझल्ट क्लोज झाला आणि त्यांना 131 मार्क पडले. म्हणजे एका मार्कांनी त्यांचा पोलीस भरतीचा रिझल्ट गेला होता. ते फर्स्ट वेटिंगला होते. धड पासही नाही आणि फेलही नाही अशा कंडिशनमध्ये ते होते. यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं व रडू कोसळत होतं. गावातील लोक ही पल्लवी पोलीस होऊ शकली नाही, तर पीएसआय काय होणार? असं बोलू लागले. तेव्हा त्यांना अजून वाईट वाटत होतं. जिथं फक्त मुलींनी संसारच करायचा असतो किंवा समाजाच्या नियमानुसार वागायचं असतं, त्याच समाजाला डावलून, त्याच समाजाला विरोध करून त्या शेतकरी किंवा कष्टकरी आई-वडिलांनी त्यांना इथपर्यंत पाठवलं होतं. 2 वर्ष स्टक ऑब्झिवेशन मध्ये आले होते, आणखी वर्ष वाया घालवायचं नव्हतं. बाजारासाठी 100 रुपये जमवणा-या त्यांच्या वडिलांनी लोकांकडून 5 हजार रुपयाचं कर्ज काढून त्यांना पीएसआयचं स्वप्न दाखवलं होतं. स्वत:ला एक अक्षरही वाचता न येणा-या त्यांच्या अशिक्षित आईंनी लोकांचे टोमणे खात त्यांना शिकवण्याची तयारी ठेवली होती. लोक म्हणायचे की, मुलगी आहे किती शिकवणार? लग्न करून टाक! त्यांच्या आईला मिळणारे टोमणे जणूकाही त्यांच्यासाठीच होते. या सर्व गोष्टींचा त्रास त्यांना होत होता. परंतु ही शर्यत जिंकणं आणि पीएसआय बनणं खूप गरजेचं होतं. त्या शर्यतीपासून ते आयुष्याच्या प्रत्येक शर्यतीवर मात करून नव्या जोमाने त्या तयारीला लागले होते. पोलीस भरतीचा रिझल्ट गेल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना म्हटले की, तुला पोलीस व्हायचेच नाही, तर फक्त पीएसआयच व्हायचे आहे आणि तू पीएसआयचाच अभ्यास कर! आज ना उद्या तुला सक्सेस मिळेलच…

मग त्यांनीही तसंच ठरवलं. आता, पीएसआयचीच चांगली तयारी करायची…पोलीस भरतीचा रिझल्ट गेला होता आणि त्याच दरम्यान महाराष्ट्र पीएसआयची प्रि एक्झाम त्या दिल्या होत्या. त्याचा रिझल्ट 7-8 दिवसातच लागला नि त्यात ते पास झाले होते. दुस-या दिवशीच डेट आली की, अवघ्या 50 दिवसातच मुख्य परीक्षासुद्धा आहे. या काळात सिलॅबस खूप ब्राॅड होता. याच्या आधी त्या पीएसआय मेन्सचा पण कधीच अभ्यास केला नव्हता. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर एक आव्हानच होतं. 50 दिवसात त्यांना 15 ते 20 विषय कव्हर करायचे होते. त्याच्यामध्ये आयपीसी, सीआरपीसी व असे बरेच कायदे नव्याने अँड (समाविष्ट) झाले होते. त्यामध्ये मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचा एक पेपर होता. त्यातल्या त्यात इंग्लिश ग्रामरचा तर प्राॅब्लेम सर्वांचा असतो, तसा त्यांचाही होता. पण त्या तयारी करायचं ठरवले होते. त्यानुसार इंग्लिश ग्रामरचा अभ्यास ते करत होते. परंतु त्यांना माहित होतं की, या 50 दिवसात आपण पाहिजे तेवढा वेळ इंग्लिशला देऊ शकत नाही. म्हणून त्या मराठी ग्रामरचाच चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. सकाळचे 8 ते रात्रीचे 8 पर्यंत रिडिंग लॅबमध्ये बसणं, तिथेच जेवण करणं, तिथेच झोपणं आणि तिथेच अभ्यास पण…असं त्यांचं शेड्युल होतं. या काळामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी त्यांनी वर्ज्य केल्या होत्या. आंघोळीला खाडा झाला तरी चालेल, पण अभ्यास चुकला नाही पाहिजे हे त्यांच्यासमोर टार्गेट होतं. त्यांची ही सगळ्यात मोठी लढाई होती. कारण या स्टेप पर्यंत त्या येईल की नाही याची त्यांना गॅरंटी नव्हती किंवा तो चॅन्स त्यांना मिळणार नव्हता. अशातच दडपण वाढत होते. गावाकडून येऊन 2 वर्ष झाली होती. म्हणून त्या खूप जोमाने अभ्यासाला लागले होते. या काळात त्यांनी अभ्यासाचे एक शेड्युल तयार केलं होतं की, कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे? एक बुक आपण किती दिवसात वाचले पाहिजे? किंवा एक तासात आपण किती पेजेस वाचले पाहिजे? अशी सर्व तयारी त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी एक चार्ट बनवून अभ्यासाला लागले होते. असा हा 50 दिवसांचा कालावधी होता.जो अभ्यास 4 वर्षात करू शकले नाही, तो अभ्यास त्यांनी फक्त त्या 50 दिवसात केला होता. स्वत:ला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं होतं.

त्यांना असं वाटत होतं की, हा आपला शेवटचा चॅन्स आहे आणि आपल्याला ते करायचंच आहे. याशिवाय पर्याय नाही. हे जाणूनच ते या सर्व गोष्टी करत होते आणि असंच तो दिवस उजाळला…मुख्य परीक्षेला ते गेले. भीती तर वाटत होती, पण ते म्हटले बघू! एमपीएससी आहे तर काहीही होवू शकतं. फेल होवू किंवा पास…आणि ते आता मेन्सच्या रिझल्टची वाट बघत होते. झालं असं की, यात दिड ते दोन महिन्याचा काळ गेला. ते ग्राऊन्डची तयारी सुरू केले होते. कारण फिजिकल टफ किंवा फिट असणं महत्त्वाचं होतं. फिजिकल एक्झाम पण तेवढीच महत्त्वाची होती. म्हणून त्याची तयारी सुरू केली होती. असंच एक दिवस मेन्सचा रिझल्ट लागला. त्यात ते चांगल्या मार्कांनी पास झाले होते. 7 ते 10 मार्कांची लीड होती. त्यांना एक खात्री आली होती की, ते यशाचा दुसरा टप्पा तर पार केला आहे. आता, तिस-या टप्प्याला पोहचायचं आहे. 100 टक्के ते तिथपर्यंत जाणारच होते. कारण त्या शेतक-याची मुलगी असल्यामुळे, शेतात काम केल्यामुळे त्यांचा फिजिकल फिटनेस एवढा भारी झाला होता की, जे ग्राऊन्ड शिकायला लोकांना एक वर्ष लागतं, जी रनिंग शिकायला लोकांना एकेक, दोन-दोन वर्ष लागतात. ती रनिंग किंवा तो स्टॅमिना त्यांनी एका महिन्यामध्ये डेव्हलप केला होता. म्हणजे शेतक-याची मुलगी असण्याचा, शेतामध्ये काम केल्याचा, एकंदरीत त्या मेहनतीचा फायदा त्यांना इथे झाला होता.
जेव्हा त्यांच्या मेन्सचा रिझल्ट लागला, त्याच्या दुस-याच दिवशी डिक्लेअर्ड झालं होतं की, थोड्याच दिवसात फिजिकल एक्झाम आहे म्हणून…याबद्दल थोडी भीती वाटत होती, थोडं दडपण आलं होतं. पण त्यांना माहित होतं की, फिजिकल एक्झाम त्यांच्यासाठी काही हार्ड नाही. ते ईझी करू शकते. आता, फक्त 16 व्या दिवशी फिजिकल होतं. त्यानुसार ते तयारीही सुरू केली होती. तसं ग्राऊन्ड तर त्यांचं चांगलच होतं. तरी पण त्यांना वाटत होतं की, एक्स्ट्रा प्रॅक्टिस केलंलं कधीही चांगलं आणि तो दिवस उजाळला. 16 मार्चला ते ग्राऊन्डवर पोहोचले. तिथे पोहचताच त्यांचा पहिलाच इव्हेंट होता 200 मीटर रनिंगचा…ते त्यांना 35 सेकंदात पूर्ण करायचं होतं. तयारीही त्यांची चांगली झाली होती आणि विश्वासही होता. परंतु ते त्यांना आता प्रॅक्टिकली करायचं होतं. इव्हेंटसाठी त्यांना लाईनवर उभं करण्यात आलं आणि त्यांचा टायमिंग सुरू झाला. 200 मीटर रनिंग करून ते एन्डलाईन कट केले. पण काळजाचे ठोके वाढले होते. कारण नेमका आपला टायमिंग किती आला? मार्क किती पडतील? ही धाकधूक होती. तेवढ्यातच ज्यांनी त्यांचा टायमिंग घेतला होता, त्यांनी सांगितलं होतं की, मॅडम काँग्रॅच्युलेशन्स तुम्ही 32 सेकंदातच आले आणि 40 पैकी 40 मार्क घेतले. हे ऐकताच त्यांना खूप आनंद झाला. कारण सगळ्यात टफ हा इव्हेंट होता आणि हा टफ इव्हेंटच त्यांना क्वाॅलिफाय व्हायचं होतं. ते क्वाॅलिफाय झाले होते.

त्याच्यानंतर सेकंड इव्हेंट होता. त्यात 3 किलोमीटर वाॅकिंग त्यांना 23 मिनिटांत करायचं होतं, ती वाॅकिंग त्यांनी 22 मिनिटांतच केली होती आणि त्याच्यामध्ये पण 40 पैकी 40 मार्क घेतले होते. असे मिळून त्यांचे 80 पैकी 80 मार्क झाले होते. आता, त्यांचा लाॅस्ट इव्हेंट राहिला होता, तो म्हणजे गोळाफेकचा…पण पहिलेपासुनच त्यांची तबेत विक होती. परीक्षेचं टेन्शन, अभ्यासाचं टेन्शन, ग्राऊन्ड करायचं, मेसचं खायचं त्याच्यामुळे त्यांच्यात तेवढी काही एनर्जी नव्हती आणि 15 मार्काचा गोळा तेव्हा ते फेकायचे…पण त्यादिवशी त्यांचं बॅडलक आणि उन पण झालं होतं. एक अँपल (सफरचंद) त्यांनी खाल्ले होते. त्या एका अँपलवर (सफरचंद) त्यांनी तो गोळा फेकला होता. त्यामुळे त्या दिवशी 15 मार्क पडण्याऐवजी त्यांना 13 च मार्क पडले होते. पण ऑलओव्हर त्यांना 93 मार्क पडले होते. 100 पैकी 93 मार्क घेणारी ते महाराष्ट्रातील एकमेव मुलगी होती. त्यांच्या बॅचला नि ग्राऊन्डवर सगळ्यात जास्त मार्क घेणारी तेच होते. अशाप्रकारे फिजिकल एक्झाम ते क्वाॅलिफाय झाले. त्यानंतर त्यांना 1/2 तास दिल्या गेला. त्या 1/2 तासात त्यांना तयार व्हायचं होतं आणि ड्रेसअप करून इंटरव्हिवसाठी यायचं होतं. 1/2 तासात ते ड्रेसिंग करून, डाॅक्युमेंटची फाईल घेऊन इंटरव्हिवसाठी थांबले. थोड्याच वेळात त्यांचा नंबर आला. इंटरव्हिवच्या ऑफिसमध्ये त्यांनी एन्ट्री केली व लोकांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ते फाॅलो केले होते. पहिल्यापासूनच म्हणजे जन्मत: देणगी असावी तसा काॅन्फिडन्स तर त्यांचा एवढा दांडगा होता. त्याचाच फायदा त्यांना तिथे झाला. याचमुळे ते एकदम त्यांच्याच स्टाॅईलने हाॅलमध्ये प्रवेश केला. परीचय वगैरे झाला. मग, प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. त्यांनी विचारलेल्या 25 प्रश्नांपैकी 22 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. अशाप्रकारे इंटरव्हिव होताच ते बाहेर पडले आणि कुठंतरी विश्वास आला की, आपला रिझल्ट तर येणारच आहे. परंतु परत एक भीती होती, एमपीएससीचा काही भरोसा नाही. शेवटपर्यंत काहीही होवू शकतं…मेरीटलिस्टपर्यंत काही सांगता येत नाही. आता, घरी आल्यानंतर ते एकच वाट बघत होते की, फायनल रिझल्ट कधी लागेल? शेवटी झालं असं की, 2 महिन्यानंतर तो सोन्याचा दिवस उजाळला. 20 मे 2015 ला दुपारचे 3 वाजता रिझल्ट डिक्लेअर्ड झाला. त्यांना एका व्यक्तीकडून फोनवर समजलं की, मॅडम तुमचा रिझल्ट आला आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये एससी कॅटेगरीत मुलींमध्ये सेकंड आले आहेत. हे ऐकून त्यांना थोडं धक्काच बसला, पण असंही वाटलं कुणीतरी मजाक पण घेत असतील तर…कारण जोपर्यंत आपण स्वत: बघणार नाही, तोपर्यंत विश्वासच बसत नव्हता. म्हणून सगळ्यात पहिले ते नेटवर गेले. तेव्हा काही त्यांच्याकडे अँड्राईड फोन नव्हता. छोटा नोकियाचा फोन वापरायचे…नेटवर चेक केलं, तर खरंच ते पीएसआय झाले होते. फक्त पीएसआयच झाले नव्हते, तर मेरीटमध्ये आले होते. 160 ला कटअप झाला होता आणि ते 195 मार्क घेतले होते.

खूप आनंद झाला होता की, त्यांची 4 वर्षाची मेहनत फळाला आली होती. त्यांच्या आई-वडिलांचं स्वप्न ते पूर्ण केलं होतं. लगेच त्यांनी त्यांच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं की, आज तुमची मुलगी फुल अँन्ड फायनल पीएसआय झाली आहे. तुम्हाला काय गोंधळ करायचं? काय धिंगाना करायचं आहे? तुम्हाला काही एन्जाॅय करायचं आहे किंवा लोकांना काही पटवून सांगायचं आहे ते सगळं सांगा! कारण ब-याचवेळा प्रिचा रिझल्ट यायचा, तर मेन्सचा येत नव्हता. अशा ब-याच अडचणी येत असतात. म्हणून ते वडिलांना सांगायचे की, कधीच कुणाला काही शेअर करू नका? जोपर्यंत फायनल रिझल्ट येणार नाही. मग, त्या दिवशी ते फुल अँन्ड फायनल त्यांना सांगितलं की, तुम्हाला काय करायचं आहे ते करा! अक्षरश: त्यांनाही खूप आनंद झाला होता. कारण ज्या परिस्थितीतून त्यांनी त्यांना इथपर्यंत पाठवलं होतं, ती एक खूप मोठी गोष्ट होती. एक सामान्य कुटूंबातील एका शेतक-याची मुलगी, जिथं मुलींना फक्त 10 वी पर्यंतच शिकवल्या जात होतं, जिथं फक्त मुलींचं 15 वर्षात लग्न लावल्या जात होतं, जिथं फक्त मुलींना संसारच करायचा असतो किंवा समाजाच्या नियमानुसार वागायचं असतं. त्याच समाजाला डावलून किंवा त्याच समाजाला विरोध करून त्या शेतकरी, त्या कष्टकरी आई-वडिलांनी त्यांना इथपर्यंत पाठवलं होतं आणि आज ते आपल्यासमोर खाकी वर्दीमध्ये उभे आहे. त्यांना असं वाटतं की, प्रत्येकजन हे करू शकतो. फक्त करायची जिद्द पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. इच्छेला कृतीची जोड द्या! कृती केल्याशिवाय काहीच होणार नाही. आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. आपण सर्वकाही करू शकतो. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा! स्वत:वर विश्वास असला, तर तुम्हाला जगात कुणीच हारवू शकत नाही. जेव्हा आपण सक्सेस मिळवतो आणि तो सक्सेस मिळवल्यानंतर आपल्या आई-वडिलांना जो आनंद होतो, तो आनंद करोडों रुपयातही विकत घेता येत नाही. म्हणून प्रत्येकांनी आपल्या आई-वडिलांना तो आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करा! आणि सर्वांनी तयारीला लागा!

लयेतील वादळे! खेटील तुफान
तरीही वाट मी चालते
अडथळ्यांना भिवून अडखडणे
पावलांना माझ्या पसंत नाही

✒️शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)भ्रमणध्वनी-7057185479

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED