कुंडलवाडी येथे शांतता समितीची बैठक संपन्न…

14

✒️अशोक हाके(बिलोली ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.9सप्टेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी येथे दि.8 सप्टेंबर 2021 रोजी नगरपालिकेच्या सभागृहात शांतता समितीची बैठक धर्माबादचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड व सहायक पोलीस उपनिरीक्षक करीमखान पठाण,पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समीतीची बैठक संपन्न झाली असुन या बैठकीत येणा-या गणेश,दुर्गा उत्सवानिमीत्त कोव्हीड 19 चे शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करून परवाना धारक गणेश मंडळांनी 4 फुट उंचीची गणेश मुर्ती तर घरगुती गणेश मंडळांनी 2 फुट उंचीची मुर्ती बसवावी,तसेत सांस्कृतीक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयी कार्यक्रम साध्यापध्दतीने साजरी करण्याचे आवाहन विक्रांत गायकवाड यांनी सर्व गणेश व दुर्गा मंडळांना आवाहन केले.

यावेळी नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेंद्र जिठावार, उपाध्यक्ष शैलेश -याकावार,यांच्यासह नगरसेवक, शहरातील प्रतिष्ठीत व्य़ापारी,नागरीक सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील,विजवितरणचे प्रतिनिधी,पत्रकार,गाव व परीसरातील गणेश व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी,उपस्थीत होते.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन अनमुलवार,शंकर चव्हाण,नागेद्र कांबळे,दिलीप जाधव,संजय चापलवार,तैनात बेग इंद्रीस बेग,महेश माकुरवार,कमलाकर,गंधकवाड,भालेराव,शेख अलिमोद्दीन आदींनी परीश्रम घेतले आहे.