इसापूर धरणाच्या पाण्याचा विसर्ग योग्य वेळी करावा- तातु देशमुख यांची मागणी

22

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

मुळावा(दि.9सप्टेंबर): -मुळावा व परिसरातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरलेल्या ईसापुर धरणात पाण्याची वाढती आवक पाहता संबंधित विभागाने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे योग्य नियोजन करावे व पर्यायी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये असे मत माझी अर्थ व बांधकाम सभापती तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तातू भाऊ देशमुख यांनी व्यक्त केले.

मुळावा व परिसरातील शेतकऱ्यांसाठी कामधेनु ठरलेल्या ईसापुर धरणात मागील बऱ्याच वर्षापासून पाणीसाठा पाहिजे त्या प्रमाणात नव्हता परंतु यावर्षी इसापुर धरण क्षेत्रातील खंडाळा, अनसिंग, गोरेगाव ,डोंगरगाव ,वाशिम ,सारखेडा, रिसोड, मेहकर ,बुलढाण्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या सर्वात मोठे धरण असलेल्या व मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या इसापुर धरणावरील असलेले छोटे व मोठे लघु प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे आज मीतिला ईसापुर धरणाचा पाणीसाठा दिनांक 8 सप्टेंबर रोजी 88 टक्के इतका असल्याने येत्या काळात धरण क्षेत्रात पाण्याची अधिक आवक येऊन धरण 100 टक्के भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यायी आतापासूनच संबंधित विभागाने जेवढी आवश्यक आहे तेवढी धरणातील पाण्याच्या विसर्गाचे टप्प्या ,टप्प्याने नियोजन करण्याची आवश्यकता आहे .

पर्यायी परिसरातील शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवता येईल एकूणच पर्यायी इसापुर धरणात पाणीसाठा समाधानकारक झाल्याने शेतकरी वर्गात आनंद साजरा करण्यात येत आहे .परंतु नदीकाठी असलेल्या शेत मालकाच्या मनामध्ये धरणाचे पाणी एकाच वेळेस गेट उचलण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास मागील 2019 च्या वर्षी प्रमाणे धरणातील पाण्याचा विसर्ग एकदम केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेला घास हिरावून अधिक खच्चीकरण होण्याची दाट शक्यता आहे.
______

“जलाशय प्रचलन आराखड्यात निर्माण झाल्यास योग्य नियोजनाने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल 2019 ची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये व नदीपात्राबाहेर पाणी जाऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल”

एच .एस. धुळगंडे उपकार्यकारी अभियंता तथा पूर नियंत्रण अधिकारी इसापूर धरण