नासिक -बस मुक्कामी 9 हजार 600 रुपये किमतीचे डिझेल चोरीला

✒️विजय केदारे(विषेश प्रतिनिधी)

नासिक(दि.9सप्टेंबर):- बसस्थानकात मुक्कामी थांबलेल्या एसटीतील डिझेल चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार महामार्ग बस स्थानकात घडला सुमारे दहा हजार रुपयाच्या डिझेलवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र बांगर राहणार पाटोदा बीड याबाबत तक्रार दाखल केली असून बांगर बीड आगार चालक म्हणून कार्यरत असून मंगळवारी रात्री दिनांक (7) नाशिक हे मुक्कामी एम एच 20 बी एल 13 27 बस पाटोदा मार्गे घेऊन शहरात दाखल झाले होते.

सायंकाळी महामार्ग बसस्थानकावर आवारातील पार्सल पॉइंट जवळ बस पार्क करून ते वाहक का सोबत घेऊन जेवणासाठी गेले असता ही घटना घडली रात्री अज्ञात चोरट्यांनी उभ्या बस मधील सुमारे( 9) हजार 600 रुपये किमतीचे शंभर लिटर डिझेल काढून घेतले ही बाब दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली प्रवासी भरण्यासाठी प्लॅटफॉर्मवर बस लावत असताना ही घटना निदर्शनात आली पुढील तपास हवालदार आडके करीत आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED