मंदाणे येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड…

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.10सप्टेंबर):-(एस) मंदाणे ता. शिंदखेडा येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत “एक झाड माझेही माझ्या ज्ञांनमंदिरात” या मुख्याध्यापक श्री. नितीन शासके सरांच्या संकल्पनेतून, शिक्षक दिनाचे औचित्य साधुन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष रोपणाचा कार्यक्रम पार पडला.

सदर कार्यक्रमास दोंडाईचा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराधक्ष्या नयनकुवरताई रावल, शिवसेना तालकाप्रमुख श्री. ईश्वर पाटील,दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, दोंडाईचा ब्रम्हकुमारी केंद्राच्या संचालिका लीला दीदीजी, सरपंच सौ. निर्मलाताई विजय माळी, उपसरपंच ब्रम्हकुमार भालचंद्र बापु चित्ते, माजी सरपंच श्री. सुनील माळी, सेवा निवृत्त शिक्षक हिंमतनाना भामरे, श्री. राजू माळी सर, श्री. अशोक पाखरे सर, शिक्षक श्री. चतुर बिरारी सर, पोलिस पाटील श्री. गोपाल भदाने, समाजसेवक श्री. सुनील देसले, अंगणवाडी शिक्षका, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED