हणेगाव येथे शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक व पोलिस पथसंचलन

🔹नियमाचे पालन करण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षिक नामदेव मद्दे यांचे आवाहान

✒️तालूका प्रतिनिधी(महादेव उप्पे)

देगलूर(दि.१०सप्टेंबर):-देगलूर तालुक्यातील हणेगाव येथे होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मरखेल पोलीस ठाणे अंतर्गत सर्व गावांमध्ये मरखेल पोलीस ठाण्याचे नवीन पदभार घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गाव,वाडी तांडयामध्ये शांतता कमिटीची बैठकीच्या माध्यमातून गणेशोत्सव फार साधेपणाने साजरी करण्याचे यावेळी आव्हान करण्यात आले,तर श्रीच्या आगमन व विसर्जनच्या मिरवणूकवर सक्त मनाई केली आहे. चार फुटाच्या खाली मूर्ती बसविण्याचे आदेश यावेळी देण्यात आले तर दारू पिऊन किंवा इतर कारणांमुळे शांतता भंग करण्याचे प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही,असे यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी सांगितले.

यावेळी हणेगाव येथील राम गणेश मंडळ, वाल्मिकी गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ, सिद्धेश्वर गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ,संगमेश्वर गणेश मंडळ, महाराष्ट्र गणेश मंडळ,आदी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाच्या मंचावर हणेगाव ग्रा.प. सरपंचपती व ग्रा.पं. सदस्य विवेक सावकार पडकंठवार माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हणेगाव, मुजीपोददीन चमकुडे उपसरपंच ग्रामपंचायत हणेगाव,वझीयोददीन चमकुडे,मोहनराव कणकवळे बीट जामदार हणेगाव, विष्णूकांत चामलवाड, नारायण पाटील रमतापूरकर,ताजीयोददीन शिळवणीकर पोलीस पाटील हणेगाव, वैजनाथ बतीनवार, राजकुमार द्याडे,पत्रकार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी नियमाचे वाचन करण्यात आले गणेश मंडळासाठी गणेश मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती दोन फूट , गणेश मंडळाला ग्रामपंचायतची परवानगी घेणे आवश्यक, कोरोनाचे सर्व दिलेल्या नियमांचे मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,डीजे वाजविण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे.

श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये, सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश किंवा मजकूर प्रकाशित करू नये,आक्षेपार्ह फलक लावू नये व अनेक अशा नियमाची यावेळी वाचन करण्यात आले व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी गणेश मंडळाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती हजेरी लावलेली होते. यावेळी मयुर पाटील, रामपुरे अभिषेक उप्पे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर मरखेल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्या नेतृत्वाखाली मरखेल येथील पोलिसांचे पथसंचलन दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोज शुक्रवारी हणेगाव नगरीमध्ये पथसंचलन करण्यात आले. यावेळी सर्व पोलिस कर्मचारी पथसंचलनामध्ये उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED