सावरगाव बंगला येथील महिलांचा एल्गार!

🔺दारू, जुगार, मटका अवैध धंदे बंद करा

✒️बाळासाहेब ढोले(पुसद तालुका प्रतिनिधी)

पुसद(दि.10सप्टेंबर):-खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत
सावरगाव (बंगला) येथील दारू, मटका, जुगार ,बंद करा याकरिता सावरगाव येथील अनेक महिलां सदस्यांनी खंडाळा पोलिस स्टेशन, व उपविभागीय पोलिस अधिकारी, पुसद याना निवेदन देण्यात आले.

सावरगाव,बंगला, येथे सर्रासपणे दारू गुटका ,मटका, जुगार असे सर्वच अवैध धंदे चालू असल्यामुळे आम्हा महिलांना याचा नाहक त्रास होत आहे आमच्याच कुटुंबातील व्यक्ती या अवैध धंद्या मागे लागले असून आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे कुटुंबातील यक्ती देशी दारू, मटका, जुगार या मागे लागल्याने आमचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे याकरिता आम्ही वेळोवेळी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे अवैध धंदे बंद करा असे ठराव सुधा घेण्यास ग्रामपंचायत प्रशासनास भाग पाडले होते परंतु आजपर्यंत गावातील कोणतेच अवैध धंदे बंद झाले नाही म्हणून आम्हा महिलांना नाईलाजास्तव आपले दैनंदिन शेतमजुरीचे, कामे सोडून पोलीस स्टेशनला चकरा माराव्या लागत आहेत असे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले.

सावरगाव बंगला येथील अवैध धंदे लवकरात लवकर बंद करावे व आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे अशा आशयाचे निवेदन पोलीस स्टेशन खंडाळा व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद यांना देण्यात आले आहे.

हे अवैध धंदे बंद न झाल्यास आम्ही समस्त ग्रामीण महिला पुढील काळात धरणे, आंदोलन, तथा रास्ता रोको सारखे आंदोलन करण्यात येतील असेही समस्त महिलांनी आपले मत निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे.निवेदनात देते वेळेस नंदा राठोड, वंदना कांबळे, संगीता चव्हाण, सुमन राठोड, शारदा राठोड, वनिता बरडे, छाया कांबळे, कमलबाई मनवर, प्रमिला मनवर ,जयश्री मनवर, शांताबाई मनवर, आम्रपाली मनवर ,मंगला मनवर, माया बलखंडे , कमल बलखंडे ,लक्ष्मीबाई रणखांब, शारदा आटपाटकर, सुरेश राठोड, विक्रम राठोड गणेश चव्हाण वंदना कांबळे, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED