झाडी शब्दसाधक राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने रामकृष्ण चनकापुरे सन्मानित

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):-झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित मुल येथे गणित अध्यापक कवी रामकृष्ण चनकापुरे यांना झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंचायत समिती सभागृहात आयोजित ह्या छोटेखानी कार्यक्रमात याप्रसंगी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख डाॕ. गुरूप्रसाद पाखमोडे , जिल्हाध्यक्ष( ग्रा.)चे कवी अरूण झगडकर ,गडचिरोली जिल्हाध्यक्ष डाॕ.चंद्रकांत लेनगुरे , पं.स. चे सभापती चंदू मार्गोनवार, संवर्ग विकास अधिकारी मयूर कळसे ,गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील शेरकी , गंगाधर कुनघाडकर ,
विलास निंबोरकर , विजय भोगेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती . प्रास्ताविक लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले.पुरस्कारादाखल मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तिपत्र,मानवस्त्र देण्यात आले.

रामकृष्ण माधवराव चनकापुरे यांचे शिक्षण बी. एस्सी. बी. एड.(गणित ) पर्यंत झालेले असून ते सहाय्यक शिक्षक पदावर घाटकुळ (पोंभुर्णा) येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात मागील १४ वर्षांपासून सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे. उत्तम अध्यापनासोबत झाडीबोली काव्यलेखन ,गजललेखन कथालेखन ते करीत असतात. झाडीबोली साहित्य मंडळातर्फे आयोजित उपक्रमात ते उत्स्फुर्तपणे सहभागी होत असतात. ग्राफीक्सकार म्हणून त्यांंनी सेवा दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक ,शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ते सातत्याने कार्यरत असतात.

त्यांना आजवर शिक्षाज्योती बहुउद्देशिय संस्था तसेच आय. आय. टी. मुंबईद्वारा QIME क्यु.आय.एम.ई च्या मास्टर ट्रेनर पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय ग्रामसाहित्य पुरस्कार, वर्ल्ड अंग्नेस्ट करप्पशन पिपल कौंसिल चा आॕयकाॕन अवार्ड मिळालेला आहे. बोलीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या झाडीबोली साहित्य मंडळ( ग्रामीण )चे जिल्हा सचिव म्हणून कार्य करीत आहे. सदर
पुरस्कार मिळाल्याबद्दल संशोधन महर्षी डाॕ. हरिश्चंद्र बोरकर ,ॲड. राजेंद्र जेनेकर तसेच शिक्षक वृंदानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED