शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांचे तहसीलदारांना निवेदन

🔸शेतकऱ्यांना अस्माणी संकटातून धीर देण्यासाठी सरकारने मदत जाहीर करणे गरजेचे – शेतकरी संघटनेची भुमिका

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.10सप्टेंबर):-गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची सर्व खरीप पिके पुर्णपणे नामोनष्ट झाली असुन ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून गेला आहे. कापसाच्या अक्षरशः ओल्या वाती झाल्या आहेत तर काढणीला आलेल्या मुग सोयाबीन, बाजरीला कोंब फुटले आहेत व ईतर पिकांची सुद्धा तशीच वाईट परिस्थिती आहे या अस्माणी संकटामुळे शेतकरी राजा पुर्णपणे हवालदिल झाला आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी माय बाप सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करणे गरजेचे आहे ते जाहीर करुन शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी विमा कंपनीला निर्देशीत करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिरीष भोसले यांनी केली आहे.

गेल्या आठ दिवसात झालेल्या मुसळधार पाऊसाने संपूर्ण खरीप पीके धोक्यात आली असून बीड जिल्ह्यातील शेतकर्यांवर अस्मानी संकट ओढावलेले आहे मात्र अशावेळी सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होताना दिसत नसुन या अस्मानी संकटाकडे कानाडोळा होताना दिसत आहे.राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आपापले पक्ष मोठे करण्यात व्यस्त असुन मुळ शेतकरी जनतेला मात्र वेठीस धरणाचे काम मविआ चे सरकार करत आहे. राज्यातील ईतर मुद्दे पुढे करून ईतर गोष्टीना महत्व देऊन शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
सुरवातीला बर्यापैकी झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची प्राथमिक वाढ चांगली झाली होती मात्र नंतरच्या काळात पावसाने लगातार जोर धरल्याने पीकांना त्याचा मोठा फटका बसला होता.कर्ज काढुन शेतकर्यांनी या वर्षी आपला पैसा शेतीत लावला होता मात्र आता विक्री साठी मालच नसल्यामुळे पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

अश्या परिस्थितीमध्ये दुर्दैवाने आत्महत्येसारख्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अश्या संकटाच्यासमयी मायबाप सरकारणे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करून पिक विमा कंपनीला पिक विमा देण्यासाठी निर्देशीत करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिरीष भोसले, तालुका उपाध्यक्ष उद्धव साबळे, तालुका संघटक रामनाथ महाडिक, जेष्ठ नेते अशोक भोसले, तालुका अध्यक्ष राजेंद्र डाके, बाळु साबळे, कृष्णा पंत तसेच बहुसंख्य शेतकर्यांची उपस्थिती होती.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED