ओबीसी मोर्चा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्यपदी आबासाहेब राजेंद्र वाघ यांची निवड

17

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगाव(दि.10सप्टेंबर):-ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीत राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा महाराष्ट्र प्रभारी मा.विनोद इंगळे व राज्याध्यक्ष डॉ. जगताप यांनी धरणगाव येथील बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आणि ओबीसी विषयाचा अभ्यासक राजेंद्र जगन्नाथ वाघ – माळी यांची ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या सदस्यपदी, उपाध्यक्ष विलास पाटील तर, जी. आर. चौधरी यांची कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती केली. तसेच, दिलेल्या नियुक्ती पत्रात ही जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्य संघटन वाढवावे, ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच ओबीसी समाजाला एकसंघ करण्यावर आपण परिश्रम कराल असा आत्मविश्वास व्यक्त करून राज्य सदस्यपदाची जबाबदारी देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आबासाहेब राजेंद्र वाघ महापुरुषांच्या विचारांचे पाईक आहेत. हे सच्चे समाजसेवक – वृक्षमित्र – सर्पमित्र – सत्यशोधक आहेत त्यांनी आज पर्यंत आपल्या सामाजिक कार्यातून त्याच बरोबर बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना ओबीसी घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. या त्यांच्या कार्याची दखल ( राष्ट्रीय पिछडा वर्ग ) ओबीसी मोर्चाचे राज्याध्यक्ष डॉ. दत्तात्रय जगताप यांनी घेऊन त्यांना यापुढच्या काळात ओबीसी समाजाला न्याय देता यावा. यासाठी महाराष्ट्र प्रदेशाच्या सदस्यपदी काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.  

आबासाहेब राजेंद्र वाघ – माळी, विलास पाटील, जी. आर. चौधरी यांच्या निवडीचे जळगाव जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र स्वागत होत आहे.