खामगाव जालना रेल्वेमार्गाचे कामास गती द्या- सौ श्वेताताई महाले यांची रेल्वे मंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.10सप्टेंबर):- ब्रिटीश काळापासून रखडलेल्या खामगाव जालना रेल्वेमार्गाचे काम सुरू करणे साठी राज्यशासन व रेल्वे मार्गास गती देण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी रेल्वे मंत्री ना रावसाहेब दानवे यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे.दि 8 सप्टेंबर 2021 रोजी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब पाटील दानवे यांची नरिमन पाइंट येथील महारेल या मुंबई येथील कार्यालयात जाऊन भेट घेऊन खामगाव जालना रेल्वे मार्गाबाबत निवेदन दिले .आ सौ श्वेताताई महाले पाटील खामगाव जालना रेल्वे मार्गाचे निवेदन देण्यासाठी महारेलच्या कार्यालयात गेल्या असता ना रावसाहेब दानवे पाटीलसाहेब राज्यातील नवीन रेल्वेमार्गासंदर्भात उच्च अधिकाऱ्याची बैठक घेणार होते.

त्याच विषयाचे निवेदन घेऊन आ सौ श्वेताताई महाले या गेल्याने ना दानवे साहेब यांनी त्यांना त्या मिटिंगमध्येच बसण्यास सांगितले . त्यावेळी राज्य शासन पुणे -नाशिक व इतर पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे लाईनचा हिस्सा भरण्यास तयार असल्याचे समजले परंतु विदर्भ मराठवाडा जोडणाऱ्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने अजूनही हमी दिलेली नाही . त्यावर आ सौ श्वेताताई महाले यांनी सांगितले म्हटले आहे की, ब्रिटिश काळातील शेकडो वर्षांपासून प्रलंबित असणारा खामगाव – जालना रेल्वे मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी भारत सरकारच्या पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मान्यता दिल्याने सदर मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे.

आ सौ श्वेताताई महाले यांनी खामगाव जालना या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला हिस्सा भरावा यासाठी या संदर्भात दि. 4 मार्च 2020 रोजी तारांकित प्रश्न क्र 1709 विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून खामगाव जालना रेल्वेमार्गाच्या विषयाला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सभागृहात वाचा फोडली होती . त्या प्रश्नाच्या उत्तरात या रेल्वेमार्गात येणाऱ्या अडचणी दूर करून सदर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्याची ग्वाही परिवहन मंत्री ना अनिल परब यांनी दिले आहे.त्या अनुषंगाने दि 9 फेब्रुवारी 2021 रोजी परिवहन मंत्री ना अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली आहे.

या बैठकीला सुधीर पटेल मुख्य अभियंता , सुरेश जैन उपमुख्य परिचलन प्रबंधक सर्वेक्षण मुख्यालय मुंबई आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते . सदर बैठकीत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देखील परिवहन मंत्री यांनी दिले आहे.त्यामुळेच राज्यशासन व रेल्वे अधिकारी यांची बैठक घ्या
आ सौ श्वेताताई महाले खामगाव जालना रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे .जेणेकरून जालना आणि बुलढाणा या मागास असलेले जिल्ह्यात उद्योग धंदे वाढून रोजगार निर्मिती होऊन विकासाला चालना मिळेल.
सदर रेल्वेमार्गाचे काम गतीने व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाचे मंत्री अधिकारी , रेल्वे अधिकारी यांचे समवेत बैठक बोलावून या रेल्वेमार्गातील सर्व अडथळे दूर करून खामगाव जालना या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशी ही विनंती आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED