राज्यातील निर्भीड पत्रकाराच्या पाठीशी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ राहणार – : संतोष निकम यांचा इशारा

28

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.10सप्टेंबर):-सत्य लिहिणाऱ्या व जनतेचा आवाज म्हणून अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या सत्यवादी व निर्भीड पत्रकारांच्या पाठीशी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ खंबीर उभा राहील असे प्रतिपादन राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी केले. नाशिक जिल्हा दौऱ्यात सुरगाणा तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरगाणा येथे आयोजित बैठकीत निकम बोलत होते. निकम यांनी पुढे सांगितले की पत्रकारांची लेखणी ही शस्त्रापेक्षाही धारदार असून गुंडगिरी , भ्रष्टाचार व अन्याय अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी पत्रकारांनी लेखणी चालवावी.

काही ठिकाणी भ्रष्टाचारी लोक तसेच गौण खनिज उत्खनन करणारे लोक, वाळू माफिया, अवैध व्यवसायिक त्याचप्रमाणे इतर दोन नंबर धंदे वाले लोक खऱ्या बातम्या लिहिणार्‍या निर्भीड, सत्यवादी पत्रकारांवर हल्ले करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात तसेच गाव गुंडांच्या मार्फत शारीरिक व मानसिक त्रास देतात. अशा अन्यायग्रस्त पत्रकारांनी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन केले . वर्षातील 365 दिवस व दिवसांतील 24 तास अहोरात्र आम्ही पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासनही राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी यावेळी दिले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन सुरगाणाचे तहसीलदार डॉ. विजय सुर्यवंशी, राष्ट्रीय विश्‍वगामी शेतकरी संघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुदामराव पाटील, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंतराव देशमुख, माणिकबाबा देशमुख, दिलीप सोमवंशी, पत्रकार संघ नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव नितीन चौधरी, सुरगाणा तालुका संपर्कप्रमुख भागवत गायकवाड, सहसंपर्क प्रमुख तुकाराम आलबाड, पेठ तालुका संपर्कप्रमुख धर्मराज महाले, संदीप धूम आदी उपस्थित होते.

कोरोना काळात उत्कृष्ट कामकाजाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते तहसीलदार डॉ. विजय सुर्यवंशी यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तहसीलदार सुर्यवंशी यांनी सत्कारास उत्तर देतांना सांगितले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जनतेचे प्रश्न निःपक्षपातीपणे मांडण्याचे काम पत्रकार करत असतात. तालुका स्तरावरील काही प्रश्न असल्यास जरूर मांडावे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगून सन्मान पत्र दिल्या बद्दल त्यांनी संघाचे आभार व्यक्त केले.सुरगाणा पोलीस ठाणे, सुरगाणा पंचायत समिती कार्यालय येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे पेठ तालुका संपर्कप्रमुख धर्मराज महाले यांच्या अभीष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास पळसन तालुका सुरगाणा येथे संतोष निकम यांनी हजेरी लावली. प्रत्यक्षात खेडोपाड्यात जाऊन पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या जागेवर सोडवणारे कर्तव्यदक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या रूपाने भेटल्याने तालुक्यातील पत्रकारांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सुरगाणा तालुक्यातील पत्रकारांनी अध्यक्ष संतोष निकम यांच्या सोबत मुक्त संवाद साधला. यावेळी मा तालुका अध्यक्ष अशोक भोये,मोतीराम पवार, सुनील धुम,सतीश गाढवे,आदी सह सुरगाणा तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.