लाडेगाव येथील गायरान जमिनितील उभ्या पिकाची जेसीबी व ट्रॅक्टरने नासधूस

26

🔸२५ जनाविरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.११सप्टेंबर):-तालुक्यातील लाडेवडगाव येथील सर्वे.न.१४३ मधील गायरान जमीनीतील उभ्या पिकाची नासधूस केल्याच्या आरोपावरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात लाडेगाव येथील २५ जनाविरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तपास प्रभारी डी.वाय.एस.पी.करीत आहेत. केज तालुक्यातील लाडेगाव येथील अनुसूचित जातीच्या २१ नागरिकांनी लाडेगाव शिवारात असलेल्या सर्वे .१४३ मधील गायरान रावसाहेब एकनाथ घिरे वय 45 वर्षे धंदा मजुरी रा. लाडेगाव ता. केज जात-महार समक्ष पो.स्टे हज़र येऊन तक्रार देतो की मी वरील गावचा राहणारा असुन लाडेगाव शिवारात सहें नं. १४३ मध्ये सरकारी गायरान अनुन सदर गायरान मी व गावातील महार समाजाचे 21 लोक अशांनी प्रतेकी दोन एकर या प्रमाणे एकून 44 एकर जमिन 30 वर्षापुर्वीपासुन वहीती करीत आहोत.

यावर्षी खरीप हंगामात आम्ही सुंदर जमिन सोयाबीन, मुग, उडीद, बाजरी, तुर ईत्यादी पिकाची पेरणी केली होती परंतु सदर जमिनीत आम्ही अतिक्रमण करून पेरणी केलेल्या क्षेत्रावरील अतिक्रमण काढावे म्हणून ऊपोषणाला बसुन गावातील लोकांना आमच्या विरुध्द अंकुश यशवंत अंबाड यांनी एकत्रीत केले आहे व गावातील लोक यावर्षी महाराचे लोकांनी गायरानात अतिक्रमण करुन पेरणी केलेले पिक त्यांना खाऊँ द्यायचे नाही असे आपसात चर्चा करीत होते. काल दि. 08/09/21 रोजी पोखरी ता. अंबाजोगाई येथील आमचे नातेवाईक मयत झाल्याने मी व आमचे भावकीतील ईतर सर्व बाया व पुरुष लोक अंत्यविधीकरीता पोखरी येथे सायंकाळी 6.00 वा. सुमारास गेलो होतो व रात्री अंदाजे नऊ वा.चे सुमारास गावात आलो व आम्ही आमचे घरीच थांबलो आज दि. 09/09/21 रोजी सकाळी 10.00 वा. चे सुमारास मी गायरान जमिनीत पेरणी केलेले सोयाबीन, तूर व बाजरी पिकाची पाहणी करण्या करीता शेतात गेलो त्यावेळी माझे व भावकीतील वैजनाथ धिरे, वचिष्ट धिरे, सतिश धिरे, सुनिल धिरे, लक्ष्मण धिरे, भिवाजी धिरे, अरुन धिरे, भिमराव धिरे, मधुकर नवगीरे, मोतीराम धिरे, अमोल धिरे, अंकुश धिरे, पांडुरंग धिरे, विठ्ठल धिरे, रामधन धिरे, दिपक धिरे, बालु धिरे, जिजाराम धिरे, परसराम धिरे, हरीभाऊ धिरे, मोहन धिरे सर्व रा. लाडेगाव यांनी गायरान जमिनीत अतिक्रमण करून पेरणी केलेले क्षेत्रावरील सोयाबीन, तुर, बाजरी या पिकांत ट्रॅक्टर व जेसिबी घालुन रोटर करून आमचे पिकाची नासधुस करुन नुकसान केले आहे. तसेच वष्टि धिरे अरुन धिरे, रामधन धिरे यांनी गायरानात तयार केलेले कडबा व लाकडाचे कोपी जाळुन नुकसान केलेले दिसले म्हणून मी भावकीतील वरील लोकांना फोन करून माहीती दिली.

गावातील राजाभाऊ दासु मुळे, धर्मराज रामभाऊ अंबाड, बाळु संभाजी अंबाड, संजय बकट अंबाड बाळासाहेब कुंडलीक अंबाड, अंकुश यशवंत अंबाड, योगेश अंकुश अंबाड, सुंदर रामकीन कदम, रामकिसन मुरलीधर कदम, युवराज श्रीहरी अंबाड़, रामभाऊ नरसु अंबाड, दिलीप रामभाऊ अंबाड, बालु भानुदास अबॉड, रवि केशव अंबाड, अशोक भगवान अबाड बनेश्वर नंदु अंबाड ऊत्तरेश्वर रामकीसन अंबाड, लक्ष्मण नरसु अंबाड, विशाल विठ्ठल क्षिरसागर, सुशांत छत्रभुज अंबाड, सुशांत बालासाहेब दादासाहेब ज्ञानोबा अंबाड, संजय सतिष अंबाड, महादेव श्रीहरी अंबाड, हरीभाऊ दासु मुळे सर्व रा. लांडगाव जात-मराठा यानी व ईतर 70 से 80 लोकांनी गावातीलच जेसिबी, ट्रॅक्टर घेऊन दि. 08/09/21 रोजी सायंकाळी 6.00 ते दि. 09/09/21 रोजी पहाटे 04.00 वा. चे दरम्यान गायरानातील आम्ही पेरणी केलेले क्षेत्रावर वरील सर्व लोकांनी रोटर करून आमचे पिकाचे नुकसान केले असावे असा माझा संशय आहे. वरील लोकांपासुन आमचे जिवीतास धोका आहे. माझी वरील फिर्याद दिली ती माझे सांगणे प्रमाणे टकलीखीत केली ते माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरी आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.