धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने महाजन, वाघ , जाधव या त्रिमूर्तींचा सत्कार व सन्मान !.

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगांव(दि.11सप्टेंबर):- धरणगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने अनोरे विद्यालयाचे आदर्श शिक्षक बी.आर.महाजन , बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , दैनिक सामना चे निर्भीड पत्रकार बाळासाहेब जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की नुकताच शिवसेनेच्या वतीने जळगाव येथे आनोरे विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक बी.आर.महाजन यांना जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल “आदर्श शिक्षक पुरस्कार ” मिळाल्याबद्दल धरणगांव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शाल पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन तालुकाध्यक्ष ऍड.व्ही.एस. भोलाणे, आर.डी.महाजन व सन्माननीय पदाधिकारी यांच्या हस्ते घरी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यानंतर दुसरे सत्कारमुर्ती तथागत गौतम बुद्ध – संत कबीर – संत रविदास – संत तुकाराम – छत्रपती शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे वारसदार , धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य , अभ्यासू व्यक्तिमत्व – पुस्तक मित्र – वृक्ष मित्र – सर्प मित्र – सत्यशोधक – मा.आबासाहेब राजेंद्र वाघ यांची बामसेफच्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा महाराष्ट्र राज्य [ OBC मोर्चा ] कार्यकारी सदस्य पदी निवड करण्यात आली. म्हणुन तालुका अधिकृत पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य जितेंद्र महाजन व बाळासाहेब जाधव व सन्माननीय पदाधिकारी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ ग्रंथ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यानंतर तिसरे सत्कारमूर्ती
शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे वारसदार , धरणगांव अधिकृत पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक , दैनिक सामना चे पत्रकार – मा.बाळासाहेब जाधव यांची कैकाडी समाज आघाडी महाराष्ट्र राज्य ” जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी ” निवड झाली म्हणुन धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य सतीश बोरसे शहराध्यक्ष लक्ष्मण भाऊ महाजन , विनोद भाऊ रोकडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ग्रंथ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

या त्रिमूर्तीचा धरणगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी धरणगाव तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष व सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED